CWG 2022 : बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया यांनी मिळवले सुवर्ण | पुढारी

CWG 2022 : बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया यांनी मिळवले सुवर्ण

बर्मिंगहॅम; पुढारी ऑनलाईन : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीयांनी कुस्तीमध्ये डंका वाजवला आहे. भारताच्या तीन कुस्ती पटुंनी सुवर्ण मिळवत भारताचा झेंडा सातासमुद्रापार फडकविला आहे. साक्षी मलिक हिने ६२ किलो गटात फ्री स्टाईलमध्ये सुवर्ण पदक पटकावले. त्या आधी भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याने ६५ किलो गटात सुवर्ण पदक पटकावले. यानंतर दीपक पुनिया याने ८६ किलो गटात सुवर्ण पदक मिळवले. अशा प्रकारे भारताच्या तिन्ही कुस्तीपटूनी भारतासाठी सुवर्ण पदक मिळवले. यासह दिव्या काकरान हिने ६८ किलो गटात कांस्य पदक पटकावले. अशा प्रकारे भारताने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एकूण २५ पदके पटकावली आहेत.

Back to top button