Commonwealth Games २०२२ : लांब उडीत भारताला रौप्यपदक मिळवून देणारा मुरली श्रीशंकर ठरला पहिला पुरुष खेळाडू | पुढारी

Commonwealth Games २०२२ : लांब उडीत भारताला रौप्यपदक मिळवून देणारा मुरली श्रीशंकर ठरला पहिला पुरुष खेळाडू

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात काल (दि. ४) लांब उडीमध्ये रौप्य पदकाची कमाई झाली. राष्टकुलमध्ये आतापर्यंत भारताने २० पदकांची कमाई केली आहे. पुरुषांमध्ये लांब उडीत देशाला रौप्य मिळवून देणारा श्रीशंकर हा पहिला खेळाडू ठरला आहे. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच अॅथलिटचे धडे घेणाऱ्या श्रीशंकरचे वडीलही दक्षिण आशियायी स्पर्धेत रौप्य पदक जिंकलेले तिहेरी उडीपट्टू आहेत. घरातूनच खेळाडू वृत्तीचे बाळकडू शिकलेल्या श्रीशंकरने कालच्या स्पर्धेत सुरुवातीला निराशा अली असतानाही संयम राखून रौप्य पदकावर आपले नाव कोरले.

त्याच्या या कामगिरीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

हे वाचलंत का?

Back to top button