Suryakumar Yadav ICC T20 Ranking : सूर्यकुमार यादव हिसकावून घेणार बाबर आझमचे सिंहासन! T20 क्रमवारीत मोठी झेप

Suryakumar Yadav ICC T20 Ranking : सूर्यकुमार यादव हिसकावून घेणार बाबर आझमचे सिंहासन! T20 क्रमवारीत मोठी झेप
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने ताज्या आयसीसी टी 20 (ICC T20) फलंदाजी क्रमवारीत दोन स्थानांनी झेप घेतली आहे. सूर्याने 2 ऑगस्ट रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 76 धावांची तडाखेबाज खेळी केली होती. त्याचा त्याला रँकिंगमध्येही फायदा झाला आहे. सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांच्यातील अंतर आता फक्त दोन रेटिंग गुणांचे आहे. बाबर आझम टी-20 फलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे. सूर्यकुमारने ताज्या क्रमवारीत पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवान आणि दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करामला मागे टाकले आहे. (Suryakumar Yadav ICC T20 Ranking)

2 ऑगस्ट रोजी झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादवने मॅचविनिंग इनिंग खेळली. या सामन्यात सूर्यकुमारने 44 चेंडूंत आठ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 76 धावा केल्या. त्याने 172.72 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. या चमकदार कामगिरीनंतरच त्याला आयसीसी क्रमवारीत झेप घेता आली. (Suryakumar Yadav ICC T20 Ranking)

बाबर आझमचे 818, तर सूर्यकुमारचे 816 रेटिंग गुण आहेत. टॉप टेन टी-20 फलंदाजांमध्ये दुसरा कोणताही भारतीय फलंदाज नाही. इशान किशन 14 व्या क्रमांकावर तर कर्णधार रोहित शर्मा 16 व्या क्रमांकावर कायम आहे. लोकेश राहुलचाही टॉप-20 फलंदाजांमध्ये समावेश आहे. तो 20 व्या स्थानावर आहे. श्रेयस अय्यरला एक स्थान गमवावे लागले आहे. तो 24 व्या स्थानावरून 25 व्या स्थानावर घसरला आहे. विराट कोहलीही एका स्थानाच्या नुकसानासह 28 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. (Suryakumar Yadav ICC T20 Ranking)

सूर्यकुमार यादवने अलिकडच्या काळात टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जोरदार फलंदाजी केली आहे आणि त्याचा परिणाम त्याच्या क्रमवारीवरही दिसून आला आहे. विंडीजविरुद्धच्या टी 20 मालिकेतील दोन सामने शिल्लक आहेत. या सामन्यांमध्ये सुर्याची बॅट तळपली तर तो नक्कीच बाबर आझमचे क्रमांक एकचे सिंहासन हिसकावून घेवू शकतो, असे दिग्गज माजी क्रिकेटरांचे म्हणणे आहे. (Suryakumar Yadav ICC T20 Ranking)

जेव्हापासून सूर्यकुमार यादवने टीम इंडियामध्ये पाऊल ठेवले आहे, तेव्हापासून तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. विशेषत: टी-20 इंटरनॅशनलमध्ये तो सतत धावा करत आहे. पहिल्यांदा क्रमांक-4 वर फलंदाजी करत त्याने धावा केल्या आणि आता विंडीजविरुद्धच्या मालिकेत तो सलामीला येत आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत सूर्यकुमार यादवने तीन सामन्यांत 111 धावा केल्या असून तो यादीत अव्वल स्थानावर आहे. सूर्याने भारतासाठी आतापर्यंत 22 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 39 च्या सरासरीने 648 धावा केल्या आहेत. त्याने नुकतेच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातही शतक झळकावले होते. (Suryakumar Yadav ICC T20 Ranking)

गोलंदाजांच्या क्रमवारीवर नजर टाकली तर फक्त भुवनेश्वर कुमार हा एकमेव भारतीय आहे ज्याचा पहिल्या दहामध्ये समावेश आहे. भुवनेश्वर कुमार 653 रेटिंग गुणांसह 8 व्या क्रमांकावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news