CWG 2022 : भारतीय वेटलिफ्टर हरजिंदर कौरने जिंकले कांस्यपदक | पुढारी

CWG 2022 : भारतीय वेटलिफ्टर हरजिंदर कौरने जिंकले कांस्यपदक

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रकूल स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर हरजिंदर कौरने महिलांच्या 71kg वजनगटात कांस्यपदक जिंकले. तिने स्नॅच फेरीमध्ये 93 किलो आणि क्लीन अँड जर्कफेरीमध्ये 119 किलो वजन उचलले. तिने एकूण २१२ किलो वजन उचलून कांस्यपदक मिळवत तिसरे स्थान पटकावले आहे. भारताला आतापर्यंत ९ पदके मिळाली आहेत.

भारत वेटलिफ्टिंगमध्ये पदकांची लयलूट करत असतानाच स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताला कांस्यपदक मिळाले. ज्युडो महिला 48 किलो वजनी गटात भारताने रौप्य पदकाची कमाई केली आहे. भारताच्या लिकमोबाम सुशीला देवीचा दक्षिण आफ्रिकेच्या मिचेला व्हाईटबोईने अंतिम सामन्यात पराभव केला. सुशीला देवीने मॉरिशियसच्या मोरांडला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्याचवेळी भारताचे अजून एक पदक निश्चित झाले. सुशीला देवी पाठापोठ ज्युडोमध्ये पुरुष 60 किलो वजनीगटात भारताच्या विजयकुमार यादवने कांस्यपदक पटकावले. हरजिंदर कौर हीने महिलांच्या ७१ किलो गटात एकूण २१२ किलो वजन उचलून कांस्यपदक जिंकले आहे.

हेही वाचा :

Back to top button