ज्युडोमध्ये दोन पदके! सुशीलादेवीला रौप्य तर विजयकुमारला कांस्यपदक | पुढारी

ज्युडोमध्ये दोन पदके! सुशीलादेवीला रौप्य तर विजयकुमारला कांस्यपदक

ज्युडो महिला 48 किलो वजनी गटात भारताने रौप्य पदकाची कमाई केली आहे. भारताच्या लिकमोबाम सुशीला देवीचा दक्षिण आफ्रिकेच्या मिचेला व्हाईटबोईने अंतिम सामन्यात पराभव केला. सुशीला देवीने मॉरिशियसच्या मोरांडला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्याचवेळी भारताचे अजून एक पदक निश्चित झाले. सुशीला देवी पाठापोठ ज्युडोमध्ये पुरुष 60 किलो वजनीगटात भारताच्या विजयकुमार यादवने कांस्यपदक पटकावले.

सुशीलाने यापूर्वीही राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकलेले आहे. 2014 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी ज्युडोमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली होती. 2014 च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेतही सुशीलाने भारतासाठी रौप्यपदक जिंकले होते.

Back to top button