IND Vs WI : ‘सिराज’च्या ‘यॉर्कर’ने टीम इंडियाची राखली लाज; अखेरच्या षटकात मिळवला विजय | पुढारी

IND Vs WI : ‘सिराज’च्या ‘यॉर्कर’ने टीम इंडियाची राखली लाज; अखेरच्या षटकात मिळवला विजय

पुढारी ऑनलाईन डेस्क : शुभमन गील (Shubhman Gill) आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) यांच्या शतकीय भागीदारी नंतर गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या बळावर भारताने वेस्ट इंडिज (IND Vs WI) विरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना शेवटच्या चेंडूवर जिंकला. अत्यंत रौमांचकारी बनलेल्या या सामन्यात गोलंदाज सिराजने (Mohammed Siraj) टाकलेल्या यॉर्करच्या बळावर भारताला तो सामना जिंकता आला. अखेरचे षटक टाकणारा मोहम्मद सिराज हा एक प्रकारे या सामन्याचा हिरोच ठरला. त्याच्या गोलंदाजीच्या बळावर भारताने हा सामना केवळ ३ धावांनी खिशात घातला.

या अटीतटीच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ (IND Vs WI) विजयाच्या समिप पोहचला होता. विंडिजच्या संघाला अखेरच्या षटकात विजयासाठी १५ धावांची आवश्यकता होती. अशा वेळी कर्णधार शिखर धवन याने अखेरचे षटक टाकण्याची जबाबदारी मोहम्मद सिराजच्या खांद्यावर सोपवली. सिराजने देखिल आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत षटकातील शेवटच्या चेंडूवर भारताला विजय मिळवून दिला. सिराजचे अखेरचे षटक अत्यंत रोमहर्षक आणि महत्त्वाचे ठरले, त्याच्या जीवावरच भारत वेस्ट इंडिजच्या भूमीत पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवू शकला.

भारताने असा मिळवला विजय (IND Vs WI)

अखेरच्या षटकात विंजला विजयासाठी १५ धावांची आवश्यकता असताना गोलंदाजीसाठी मोहम्मद सिराज पुढे आला. सिराज यांच्या पहिल्या चेंडूवर हुसेन धाव घेण्यात अपयशी ठरला. यानंतर दुसऱ्या चेंडूवर हुसेन याने १ धाव घेतली. त्यामुळे शेफर्ड हा स्ट्राईकवर आला. शेफर्ड याने सिराजच्या तिसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला आणि विंडिजच्या विजयाची आशा पुन्हा पल्लवीत केली. चौथ्या चेंडूवर शेफर्ड फक्त दोनच धावा घेऊ शकला. आता विजयासाठी विंडिजला २ चेंडूत ८ धावांची आवश्यकता होती. पुढील चेंडू सिराज वाईड टाकला. त्यामुळे भारतीयांच्या ह्रदयाचे ठोके पुन्हा एकदा वाढले होते. सिराज वाईड चेंडूमुळे विंडिजला २ चेंडूत ७ धावांची गरज होते. आता फक्त दोन चेंडू बाकी होते. सिराजने पाचवा चेंडू टाकला, या चेंडूवर शेफर्डने पुन्हा २ धावा घेतल्या. आता विंडिजला केवळ ५ धावांची गरज होती. शेवटचा चेंडू सिराजने यॉर्कर टाकला तो चेंडू फलंदाजाला खेळता आला नाही व चेंडू मागे यष्टीरक्षकाकडे गेला. या चेंडूवर विंडिज केवळ एकच धाव घेऊ शकला. शेवटच्या यॉर्कर चेंडूमुळे भारताने हा रौमांचक सामना अवघ्या ३ धावांनी जिंकला. शेवटचे षटक टाकणारा मोहम्मद सिराज हा या सामन्याचा खऱ्या अर्थाने हिरो ठरला.

या विजयासह भारताने एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. अखेरचे दोन चेंडू सिराजने यॉर्कर लेन्थ टाकले त्यामुळे भारत या सामन्यात यश मिळवू शकला. सध्या अखेरच्या षटकामुळे सिराज चांगलाच चर्चेत आला आहे. सोशल मीडियात सिराजचे आणि त्याच्या गोलंदाजीचे चांगले कौतुक होत आहे. तसेच त्याने टाकलेला शेवटचा चेंडू आणि शेवटचे षटकाची व्हिडिओ क्लिप चांगलीच वायरल होत आहे.

Back to top button