IND vs ENG Test : इंग्‍लंडचा पहिला डाव २८४ धावांवर आटोपला, भारताला १३२ धावांची आघाडी | पुढारी

IND vs ENG Test : इंग्‍लंडचा पहिला डाव २८४ धावांवर आटोपला, भारताला १३२ धावांची आघाडी

पुढारी ऑनलाईन डेस्क : 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्‍यातील तिसर्‍या दिवशी भारताला १३२ धावांची आघाडी मिळाली. इंग्‍लंडचा पहिला डाव २८४ धावांवर आटोपला.

बेअरस्टोकडून डाव सावरण्‍याचा प्रयत्‍न

बेअरस्टोने शतक झळकावले. त्याने 102 धावांची खेळी करत इंग्लंडचा पहिल्या डाव सावरला. बेअरस्‍टो इंग्‍लंडचा डाव सावरण्‍याचा प्रयत्‍न करत असतानाच शमीने त्‍याला १०६ धावांवर बाद केले. इंग्‍लंडने सात गडी गमावत २४१ धावा केल्‍या. यानंतर इंग्‍लंडचा डाव सावरला नाही. पुढील तीन फलंदाज केवळ ४३ धावा जाेडू शकले.

इंग्लंडच्या पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी केलेल्या तिखट माऱ्यापुढे इंग्लडच्या फलंदाजांना फार काळ टिकता आले नाही. पहिल्‍या डावात भारताच्‍या वेगवान गाेलंदाज माेहम्‍मद सिराजने ६६ धावा देत सर्वाधिक ४ विकेट घेतल्‍या. तर बुमराहने तीन आणि शम्‍मी २ आणि शार्दुल ठाकूरने १ बळी घेतला.

जॉनी बेअरस्‍टोने याचे भारताविरोधात पहिले शतक झळकावले आहे. तर कसोटीमधील त्‍याचे हे तिसरे शतक आहे. तसेच त्‍याचे हे सलग तिसरे शतक आहे. यापूर्वी त्‍याने न्‍यूझीलंडविरोधात सलग दोन कसोटी सामन्‍यात अनुक्रमे १३६ आणि १६२ धावांची खेळी केली होती.

दुसर्‍या दिवशीच्या खेळात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या ५ फलंदाजांना माघारी पाठवले हाेते. इंग्लंडची सलामीची जोडी भारताचा कर्णधार व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने फोडली. त्याने ॲलेक्स लेस (६) आणि झॅक क्रॉली (९) यांना फार काळ टिकू दिले नाही. त्यासोबतच त्याने तिसऱ्चा क्रमांकावर खेळण्यासाठी मैदानावर उतरलेल्या ओली पोप याला देखील स्वस्तात तंबूचा रास्ता दाखवला त्याने १८ चेंडूत १० धावा केल्या. चार नंबरवर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या ज्यो रूटला मोह्हमद सिराजने पंत करवी बाद केले. यावेळी रूट ३१ धावा करून बाद झाला. ज्यो रूटनंतर फलंदाजी करण्यासाठी आलेला बेन स्टोक सध्या शतकाच्या उंभरट्यावर उभा आहे. त्याने ८०.५३ च्या सरासरीने ११३ चेंडूत ९१ धावा केल्या आहेत. इंग्लंडची धावसंख्या सध्या ४५.३ षटकांनंतर ६ बाद २०० अशी हाेती.

Back to top button