महिलांसाठी सहा संघांचे आयपीएल सुरू करावे : स्मृती मानधना | पुढारी

महिलांसाठी सहा संघांचे आयपीएल सुरू करावे : स्मृती मानधना

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था: इंडियन प्रीमिअर लीगमुळे भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा दर्जा उंचावला आहे, त्यामुळे महिलांचीही आयपीएल सुरू करावी, अशी मागणी भारताची आघाडीची महिला फलंदाज स्मृती मानधना हिने केली आहे.

‘सहा संघांची लीग खेळवण्यासाठी देशाकडे पुरेशा महिला खेळाडू आहेत. यामुळे राष्ट्रीय संघासाठी खेळाडूंची मजबूत फळी निर्माण करण्यास मदत मिळेल,’ असेही स्मृती मानधना म्हणाली.

स्मृती म्‍हणाली की,   पुरुष आणि महिला खेळाडूंसाठी खेळण्याकरिता समान राज्य आहेत.

पुरुषांचे आयपीएल सुरू झाले तेव्हादेखील राज्यांची संख्या ही इतकीच होती; पण दरवर्षी खेळाडूंचा खेळण्याचा दर्जा वाढत गेला.

आज जे आयपीएल आहे ते 10 वर्षांपूर्वी देखील तसेच होते. माझ्या मते महिला क्रिकेटसाठी देखील हे समानच आहे.

सध्या पाच किंवा सहा संघांनी मिळून सुरुवात करू शकतो

‘सध्याच्या परिस्थितीत आपण पाच किंवा सहा संघांनी सुरुवात करू शकतो आणि एक किंवा दोन वर्षांत आपण आठ संघदेखील करू शकतो. मात्र, जोवर आपण सुरुवात करत नाही तोवर आपल्या खेळाडूंना म्हणावा तसा दर्जा देऊ शकणार नाही,’ असे स्मृती मानधना म्हणाली.

महिला बिग बॅशमुळे ऑस्ट्रेलियन संघासाठी मजबूत फळी तयार झाली आणि महिला आयपीएलच्या माध्यमातून भारतात देखील असे केले जाऊ शकते. यावर स्मृती म्हणाली की, ‘मी चार वर्षांपूर्वी बिग बॅश लीगमध्ये खेळले होते आणि त्यांच्या खेळाचा दर्जा हा वेगळा झाला आहे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये ४० ते ५० खेळाडू केव्हाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये देखील असेच व्हावे, असे मला वाटते.’

हेही वाचलंत का? 

Back to top button