इंग्लंडमध्ये ख्रिस गेलची भेट घेतल्याने मल्ल्या ट्रोल | पुढारी

इंग्लंडमध्ये ख्रिस गेलची भेट घेतल्याने मल्ल्या ट्रोल

लंडन : वेस्ट इंडिजचा दिग्गज खेळाडू ख्रिस गेलचे एक छायाचित्र सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या छायाचित्रामध्ये गेलसोबत विजय मल्ल्या दिसून येत आहे. भारताने फरार म्हणून घोषित केलेल्या मल्ल्याने गेलसोबतचा फोटो ट्विट करताना लिहिले आहे की, माझा मित्र गेलशी भेट घेऊन चांगले वाटले. ज्यावेळी बंगळूर संघात तुला घेतले तेव्हापासून आमची कमालीची मैत्री बनली आहे. गेलसोबतचे छायाचित्र आणि ट्विटमुळे मल्ल्या चांगलाच ट्रोल होत आहे. लोकांनी त्याच्याकडे पैसे मागण्यास सुरुवात केली आहे. विजय मल्ल्या सध्या सुमारे 9 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात भारतात वाँटेड आहे. हा घोटाळा बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सला दिलेल्या कर्जासंबंधीचा आहे. मल्ल्यावर सध्या मनिलाँड्रिंग आणि कर्ज रकमेचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

Back to top button