ICC T20 Ranking : दिनेश कार्तिकची आयसीसी क्रमवारीत मोठी झेप, ईशान किशन टॉप टेनमध्ये | पुढारी

ICC T20 Ranking : दिनेश कार्तिकची आयसीसी क्रमवारीत मोठी झेप, ईशान किशन टॉप टेनमध्ये

मुंबई; पुढारी ऑनलाईन : आपल्या आयपीएल मधील कामगिरीवर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या दिनेश कार्तिकने टी २० रॅकिंगमध्ये (ICC T20 Ranking) मोठी झेप घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेत देखिल त्याने चांगली कामगिरी बजावत आयसीसी रॅकिंगमध्ये सुद्धा १०८ व्या स्थानावरुन ८७ स्थानावर झेप घेतली आहे. त्याच्यासह सलामीचा फलंदाज ईशान किशान याने टॉप टेनमध्ये स्थान मिळवले आहे. ईशान किशनने (Ishan Kishan) आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत दोन अर्धशतके झळकावली होती.

ईशान किशनने या मालिकेत ४१ च्या सरासरीने २०६ धावांसह मालिकेत सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज ठरला होता. याच कामगिरीमुळे ईशान किशन याने टी २० रॅकिंगमध्ये (ICC T20 Ranking) थेट सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) अद्याप पहिल्या स्थानावर विराजमान आहे. भारताचा ईशान हा एकमेव फलंदाज आहे, ज्याने पहिल्या १० मध्ये स्थान मिळवले आहे. तसेच साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सहा विकेट घेणारा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) देखिल २३ स्थानी झेप घेतली आहे.

गोलंदाजांचा विचार केला तर जॉश हेझलवूड (Josh Hazlewood) याने आपले पहिले स्थान आबाधित ठेवले आहे. तसेच अफगानिस्तानचा स्टार स्पिनर राशिद खान (Rashid Khan) आणि श्रीलंकेचा वानिंदु हसरंगा (Wanindu Hasaranga) यांनी एक स्थानाची बढती घेऊन अनुक्रमे तिसरे व सहावे स्थान पटकावले आहे. तर ऑलराऊंडर रॅगिंकमध्ये (ICC T20 Ranking) भारताचा अष्ट्रपैलू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आपले पहिले स्थान राखून आहे. सध्या रविंद्र जडेजा इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडमध्ये संघासोबत तयारी करत आहे. बांग्लादेशचा कर्णधार शाकिब अल हसन हा ऑलराऊंडरच्या रॅकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.

भारताच्या फलंदाजांचा विचार केला तर माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohali) ७४२ अंकासह कसोटी क्रमवारीत आपले १० क्रमांकाचे स्थान टिकवून आहे. तसेच अनुभवी स्पिनर रवीचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) ८५० अंकासह तर जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) ८३० अंकासह गोलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

Back to top button