रितिका सजदेह हिने तीन आवडत्या मुलांचा फोटो केले शेअर | पुढारी

रितिका सजदेह हिने तीन आवडत्या मुलांचा फोटो केले शेअर

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारताने इंग्लंड विरुद्धची दुसरी कसोटी जिंकल्यानंतर रोहितची पत्नी रितिका सजदेह हिने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. कोणत्याही दौऱ्यावर जर थोडा रिकामा वेळ मिळाला तर रितिका आणि रोहित शर्मा हे दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवणे पसंद करत असतात.

दुसरी कसोटी जिंकल्यानंतर रितिका सजदेह आपला पती रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर आणि कुणाल यांच्याबरोबरचा ग्रुप फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. या फोटोला तिने ‘माझी तीन आवडती मुले’ असे कॅप्शन दिले. यावेळी एका फॅनने तिला त्या तिघांमध्ये शार्दुल ठाकूर देखील असल्याची आठवण करुन दिली.

यावर रितिका सचदेहने ‘शर्मा फॅमेलीबरोबर शार्दुल चाचू ज्या पद्धतीने हँगआऊट करतो ते मला खरोखरच आवडते’ अशी प्रतिक्रिया दिली. दुसऱ्या एका चाहत्याने रोहित शर्माच्या फलंदाजीची स्तुती केली. त्याने ‘तुझा पती जगातील सर्वात चांगल्या फलंदाजा पैकी एक आहे याचा तुला मोठा अभिमान असेल.’ अशी प्रतिक्रिया दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ritika Sajdeh (@ritssajdeh)

एका चाहत्याने तर शार्दुल ठाकूर आणि रोहित शर्माची खेचली. त्याने ‘अरे आता समजले यासाठीच ठाकूर २०१९ च्या आयपीएल फायनलमध्ये शेवटच्या चेंडूवर बाद झाला होता.’ अशी खोचक प्रतिक्रिया दिली.

रोहित आणि शार्दुल ठाकूर सध्या इंग्लंडमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहेत. पहिली कसोटी ड्रॉ झाल्यानंतर भारताने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला १५१ धावांनी मात देत मालिकेत १ – ० अशी आघाडी घेतली आहे.

दुसऱ्या कसोटीत रोहित शर्माने दमदार फलंदाजी करत १४५ चेंडूत ८३ धावांची खेळी केली. तर त्याचा पार्टनर केएल राहुलने १२९ धावांची शतकी खेळी केली. पहिल्या कसोटीत गोलंदाजीत चमक दाखवलेल्या शार्दुल ठाकूरला दुसऱ्या कसोटीत खेळण्याची संधी मिळाली नाही. मालिकेतला तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्टपासून हेडिंग्लेवर सुरु होणार आहे.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : आणि काय हवं? चा तिसरा सिझन 

 

Back to top button