पीएम मोदी यांनी सिंधूच्या कोरियन कोचला का दिले 'अयोध्या' भेटीचे आमंत्रण? | पुढारी

पीएम मोदी यांनी सिंधूच्या कोरियन कोचला का दिले 'अयोध्या' भेटीचे आमंत्रण?

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

पीएम मोदी यांनी सोमवारी आपल्या निवासस्थानी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी खेळाडूंसाठी ब्रेकफास्टचे आयोजन केले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी. व्ही. सिंधूचे कोरियन प्रशिक्षक पार्क तैसांग यांच्याशी संवाद साधला. या संवादात त्यांनी कोरिया आणि अयोध्यामधील विशेष नात्याबाबत माहिती दिली.

या संवादादरम्यान, पीएम मोदी यांनी दक्षिण कोरियन प्रशिक्षकांना अयोध्येबाबत काही माहिती आहे का असे विचारले. ते म्हणाले ‘कोरिया आणि अयोध्या यांच्यात खूपच विशेष असे नाते आहे. गेल्या वेळी तुमच्या देशाच्या फर्स्ट लेडी, तुमच्या राष्ट्रध्यक्षांच्या पत्नी अयोध्येत एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. तुम्हीही अयोध्येला नक्की भेट द्यावी आणि त्याच्या इतिहासाची माहिती घ्यावी. तुम्हाला त्याचा गर्व वाटेल.’

अयोध्येची राजकुमारी झाली कोरियाची राणी

पीआयबी इंडियाच्या मते, अयोध्या आणि कोरियाचा ऐतिहासिक संबंध आहे. अयोध्याची राजकुमारी सुरीरत्न साधारणपणे २००० हजार वर्षापूर्वी कोरियाला गेल्या होत्या. त्यांनी कोरियन राजा सुरो यांच्याशी विवाह केला होता.

दक्षिण कोरियाच्या फर्स्ट लेडी किम जुंग सूक यांनी २०१८ ला अयोध्येतील यांनी क्विन ह्यु पार्क मधील क्विन ह्यु मेमोरियलच्या भूमीपुजनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती.

पीएम मोदी यांनी तो शब्द पाळला

दरम्यान पीएम मोदी यांनी पी. व्ही. सिंधूला दिलेला शब्द पाळला. त्यांनी दोन वेळा ऑलिम्पिक विजेत्या सिंधूबरोबर आईसक्रीम खाण्याचे आश्वासन दिले होते. ते त्यांनी पंतप्रधान निवास स्थानावर आयोजित ब्रेकफास्टवेळी पूर्ण केले.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूने भारताचे पदकांचे अकाऊंट उघडले होते. तिने वेटलिफ्टिंग महिला ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले होते. पदक जिंकल्यानंतर चानूने तिला सरावाच्यावेळी लिफ्ट देणाऱ्या ट्रक ड्रायव्हरचा देखील सन्मान केला होता.

मीराबाई चानूच्या त्या कृतीची प्रशंसा

दरम्यान, पीएम मोदींनी चानूच्या या कृतीची प्रशंसा केली होती. ते म्हणाले ‘तू त्या चालकाचा सन्मान केलास. असे फक्त उच्च नैतिक मुल्य असलेले लोकच करु शकतात. मला असे वाटते की देशातील प्रत्येक नागरिकाने याच्यापासून प्रेरणा घेतली असेल.’

पीएम मोदी यांनी आपल्या स्वतंत्रतादिवस सोहळ्यातील भाषणात भारतीय ऑलिम्पिक खेळाडूंचा सन्मान केला होता. देशाला तुमचा अभिमान आहे आणि तुमच्याकडून पुढची पिढी प्रेरणा घेणार आहे असे सांगितले होते. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंतची सर्वात चांगली कामगिरी करत एकूण सात पदके जिंकली. यात एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांचा सामावेश आहे.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : एक स्त्री आणि दोन पुरुष एकत्र राहू शकतात का?

Back to top button