मोहम्मद सिराजचा हैदराबादी डान्स : असा जबरा डान्स होणे नाही (video) | पुढारी

मोहम्मद सिराजचा हैदराबादी डान्स : असा जबरा डान्स होणे नाही (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : ENG vs IND : मोहम्मद सिराजचा हैदराबादी डान्स : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने लॉर्ड्स कसोटी सामन्यात शानदार गोलंदाजी केली. त्याने सामन्यात 8 बळी मिळवण्यात निर्णायक कामगिरी केली.

सिराजने पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावातही 4 विकेट्स घेतल्या. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात सिराजने जेम्स अँडरसनला बाद करत इंग्लंडचा डाव गुंडाळला. लॉर्ड्समधील विजयानंतर भारतीय खेळाडूंनी लॉर्ड्सच्या ड्रेसिंग रुममध्ये जोरदार सेलिब्रेशन केले.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात मयंक अग्रवाल आणि मोहम्मद सिराज (मोहम्मद सिराजचा हैदराबादी डान्स) जबरदस्त नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

लॉर्ड्सवरील विजयानंतर सिराजने सोशल मीडियावर पोस्टही शेअर केली आहे आणि या विजय संस्मरणीय अस्लयाचे म्हटले आहे.

सिराजने लिहिले, ‘जादू ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवायला शिकवते. जर तुम्ही ते करू शकलात तर तुम्ही काहीही साध्य करू शकता. किती अद्भुत विजय, संपूर्ण टीमचा प्रयत्न.

केएल राहुलला सामनावीराचा किताब देण्यात आला असला तरी भारतीय गोलंदाजांनी लॉर्ड्स कसोटीत खरी मजा आणली.

प्रथम, शमीने भारताच्या दुसऱ्या डावात अर्धशतक केले.

दुसरीकडे, भारतीय गोलंदाजांच्या गोलंदाजीने कहर केला आणि इंग्लिश फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत आता 1-0 ने पुढे आहे. पहिला कसोटी सामना पावसामुळे अनिर्णित राहिला.

मोहम्मद सिराजने कपिल देवचा विक्रम मोडला

सिराजने लॉर्ड्सवर 8 विकेट्स घेतल्या. असे करून त्याने कपिल देवच्या विक्रमाची बरोबरी केली. कपिल देव यांनी लॉर्ड्सवर एक कसोटी सामना खेळताना 8 विकेट्स घेतल्या होत्या.

1982 मध्ये लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या कसोटीत कपिल देव यांनी 53 षटके टाकली आणि 168 धावा देऊन 8 बळी घेतले होते.

त्याच वेळी, 2021 लॉर्ड्स कसोटीत सिराजने 40.5 षटके टाकली आणि 8 बळी घेतले.

लॉर्ड्सवर भारतीय गोलंदाजांच्या सर्वोत्तम गोलंदाजीच्या बाबतीत सिराजने महान कपिल देवचा विक्रम मोडला आहे.

Back to top button