भारताची गोल्फर आदिती अशोक ब्रिटिश ओपनच्या पात्रता फेरीत दुसऱ्या स्थानी | पुढारी

भारताची गोल्फर आदिती अशोक ब्रिटिश ओपनच्या पात्रता फेरीत दुसऱ्या स्थानी

कार्नौस्टी; पुढारी ऑनलाईन : भारताची गोल्फर आदिती अशोक महिलांच्या ब्रिटिश ओपन स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. १८-होल क्वालिफायरमध्ये तिने दुसरे स्थान मिळवले. टोकियो ऑलिम्पिकमध्ये २३ वर्षीय आदिती अशोक हिचे पदक थोडक्यात हुकले होते.

टोकियोमध्ये तिला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. आदिती ऑलिम्पिकच्या गोल्फमध्ये चौथ्या स्थानी पोहोचलेली पहिली भारतीय महिला गोल्फर आहे. आता तिने महिलांच्या ब्रिटिश ओपनमध्ये धडक मारली आहे.

ब्रिटिश ओपन स्पर्धा १९ ते २२ ऑगस्ट दरम्यान पार पडणार आहे. कार्नौस्टी लिंक्समध्ये ही स्पर्धा खेळली जाणार आहे. या स्पर्धेची पात्रता फेरी पनमुरे गोल्फ क्लब येथे पार पडली. हा जगातील सर्वांत जुना गोल्फ क्लब आहे.

पात्रता फेरीत अन्य एक भारतीय गोल्फर त्वेसा मलिक हिला संयुक्त २९ वे स्थान मिळाले. यामुळे ती या स्पर्धेसाठी पात्र ठरु शकली नाही.

रियो ऑलिम्पिकमध्ये आदितीला ४१ वे स्थान मिळाले होते. तर टोकियो ऑलिम्पकमध्ये तिने चांगली कामगिरी केली. पण तिचे पदक हुकले.

आदिती अशोक हिचा जन्म १९९८ मध्ये बंगळूरमध्ये झाला. तिला लहानपासानूच गोल्फ खेळण्याची आवड होती.

आदिती ही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारी भारताची पहिली महिला गोल्फर आहे. तिने याआधी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. यात २०१३ मधील एशियन यूथ गेम्स, २०१४ मधील यूथ ऑलिम्पिक गेम्स आणि २०१४ मधील एशियन गेम्सचा समावेश आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : अफगाणिस्तान : काबूल विमानतळावर उडत्या विमानातून तिघेजण कोसळले, टायर पकडून चालले होते लटकत |

Back to top button