भारताने हाँगकाँगला चिरडले; विजयाची नोंदविली हॅट्ट्रिक | पुढारी

भारताने हाँगकाँगला चिरडले; विजयाची नोंदविली हॅट्ट्रिक

कोलकाता : वृत्तसंस्था; भारतीय फुटबॉल संघाने आशिया चषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीतील आपल्या शेवटच्या सामन्यात हाँगकाँगवर 4-0 अशा गोलफरकाने एकतर्फी मात करत विजयाची हॅट्ट्रिक नोंदविली. या सामन्यापूर्वीच भारतीय संघ एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धा-2023 साठी पात्र ठरला होता.

कोलकाता येेथे मंगळवारी रात्री झालेल्या हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाच्या वतीने अन्वर अली (दुसरे मिनिट), सुनील छेत्री (44 वे मिनिट), मानवीर सिंग (85 वे मिनिट) आणि ईशान पंडिता (93 वे मिनिट) यांनी गोल केले. हाँगकाँगला नमवून भारताने पात्रता फेरी स्पर्धेत सलग तिसर्‍या विजयाची नोंद केली. या लढतीपूर्वी भारताने अफगाणिस्तान व कंबोडियाला पराभूत केले होते. सलग तिसर्‍या विजयाने भारतीय संघ ‘ड’ गटात अव्वल स्थानी राहिला. पात्रता फेरीतील तीन विजयांच्या बळावर भारतीय संघ सलग दुसर्‍यांदा आशिया चषक स्पर्धेसाठी पात्र ठरला.

Back to top button