Ind Vs Eng 2nd Test: भारताला दुसर्‍या डावात १५४ धावांची आघाडी

लंडन ; पुढारी ऑनलाईन: Ind Vs Eng 2nd Test दुसर्‍या कसोटी सामन्‍याच्‍या दुसर्‍या डावात भारताने १५४ धावांची आघाडी घेतली आहे. भारताने दुसर्‍या डावात ६ बाद १८१ धावा केल्‍या आहेत. आज पाचव्‍या दिवशी सामना निर्णायक अवस्‍थेत आला आहे.

कर्णधार ज्यो रूटच्या नाबाद १८० धावांच्या जोरावर इंग्लंडने दुसर्‍या कसोटीच्या पहिल्या डावात तिसर्‍या दिवसअखेरीस २७ धावांची आघाडी घेतली होती. त्यांचा पहिला डाव ३९१ धावांवर आटोपला.

दुसर्‍या डावात भारताने सावध सुरुवात केली. मात्र भारताच्‍या सलामीवीरांनी निराशा केली. केएल राहुल याला मार्क वूडने ५ धावांवर बाद केले. पहिल्‍या डावाप्रमाणे रोहित खेळी करणार अशी आशा असताना मार्क वूडने त्‍याला तंबूची वाट दाखवली. यानंतर सॅम करनने कर्णधार विराट कोहली याला विकेटकीपर बटलरकडे झेल देणे भाग पाडले.

चेतेश्‍वर पुजारा -‍ अजिंक्‍य रहाणे यांनी भारताचा डाव सावरला

चौथ्‍या दिवशीच्‍या पहिल्‍या सत्रात तीन बळी घेतल्‍याने इंग्‍लंडने निर्णायक आघाडी घेतल्‍याचे चित्र होते. अशा आव्‍हानात्‍मक परिस्‍थितीत चेतेश्‍वर पुजारा आणि उपकर्णधार अजिंक्‍य रहाणे यांनी १०० धावांची भागीदारी करत भारताचा डाव सावरला. मार्क वूडने पुजाराला ४५ धावांवर बाद केले. यानंतर अजिंक्‍य रहाणे (६१ धावा) आणि रवीद्र जडेजा (3 धावा) यांना फिरकीपटू मोईन अलीने बाद केले.

अंधूक सूर्यप्रकाशामुळे चौथ्‍या दिवशीचा खेळ थांबविण्‍यात आला. तेव्‍हा इशांत शर्मा ४ तर ऋषभ पंत १४ धावांवर खेळत होते.

धावफलक
भारत पहिला डाव : ३६४
इंग्‍लंड पहिला डाव : ३९१
भारताचा दुसरा डाव : ६ बाद १८१

हेही वाचलं का? 

Exit mobile version