IND vs SA T20 : चला आता निळी जर्सी घालण्याची वेळ झाली… | पुढारी

IND vs SA T20 : चला आता निळी जर्सी घालण्याची वेळ झाली...

नवी दिल्‍ली ; वृत्तसंस्था : दोन महिने इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या माध्यमातून वेगवेगळ्या रंगांची जर्सी परिधान करून क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन केल्यानंतर आता भारतीय खेळाडू निळी जर्सी घालून राष्ट्रीय कर्तव्यावर परतणार आहेत. 9 जूनपासून भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच टी-20 (IND vs SA T20) सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग 12 टी-20 सामने जिंकून अफगाणिस्ताच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली आहे.

रोहित, विराट कोहली व जसप्रीत बुमराह या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली भारताला ही विजयी पताका अशीच फडकवत ठेवायची आहे. भारताने पहिला सामना जिंकल्यास सलग 13 टी-20 सामना जिंकणारा तो जगातील पहिला संघ ठरणार आहे.

ऋषभ पंतकडे उपकर्णधारपद आहे. हार्दिक पंड्या व दिनेश कार्तिक यांचे या मालिकेतून टी-20 संघात पुनरागमन होत आहे. उमरान मलिक व अर्शदीप सिंग यांना पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे या मालिकेत भारताच्या दुसर्‍या फळीवर सर्वांचे लक्ष लागून आहे.

भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेचे वेळापत्रक (IND vs SA T20)

पहिली टी-20 : 9 जून, दिल्ली

दुसरी टी-20 : 12 जून, कटक

तिसरी टी-20 : 14 जून, विशाखापट्टणम

चौथी टी-20 : 17 जून, राजकोट

पाचवी टी-20 : 19 जून, बंगळूर

सामन्याची वेळ व थेट प्रक्षेपण: भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेतील सर्व सामने सायंकाळी 7 वाजल्यापासून सुरू होतील. स्टार स्पोर्टस्वर हे सामने पाहता येतील.

Back to top button