Jos Buttler : बटलरची विराटच्या विक्रमाशी बरोबरी; अंतिम सामन्यात मागे टाकण्याची संधी | पुढारी

Jos Buttler : बटलरची विराटच्या विक्रमाशी बरोबरी; अंतिम सामन्यात मागे टाकण्याची संधी

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सलामीवीर जोस बटलरने (Jos Buttler) महत्त्वाच्या सामन्यात पुन्हा एकदा धडाकेबाज शतक झळकावले. या शतकासह बटलरने अनेक विक्रम देखिल मोडीत काढले. बटलरचा हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी हंगाम ठरला आहे. आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये त्याने चार शतके झळकावली. नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज बंगळुरू (Royal Challengers Bangalore) आणि राजस्थान यांच्यात सर्वात महत्त्वाचा सामना रंगला होता. या सामन्यात बटलरने झंझावाती खेळी करत सामना एकतर्फी करुन टाकला. या शतकासह बटलरने विराट कोहलीच्या (Virat Kohli) विक्रमाशी बरोबरी केली.

आयपीएल २०१६ चा हंगाम कोहली ठरला सर्वात यशस्वी

विराट कोहलीसाठी २०१६ चा हंगाम सर्वात यशस्वी ठरला होता. आयपीएलच्या एका मोसमात ४ शतके झळकावणारा विराट पहिला फलंदाज ठरला होता. त्याचा हा विक्रम आज देखिल अबाधित आहे. आता या विक्रमाशी राजस्थानच्या जोस बटलरने (Jos Buttler) बरोबरी केली आहे. २०१६ च्या हंगामात विराटची सर्वोच्च धावसंख्या ११३ होती. त्याने १६ सामन्यात ८१.०८ च्या सरासरीने आणि १५१.०३ च्या स्ट्राईक रेटने ९७३ धावा केल्या होत्या. तसेच १६ सामन्यांमध्ये तो चार वेळा नाबाद होता. कोहलीने या मोसमात ३८ षटकार ठोकले होते. त्याचा संघ आरसीबी अंतिम फेरीत पोहोचला, पण सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.

एका हंगामात सर्वाधिक धावा (Jos Buttler)

यंदाचा हंगाम जोस बटलरसाठी (Jos Buttler) खूपच यशस्वी ठरला आहे. त्याने या हंगामात आतापर्यंत ८२४ धावा केल्या आहेत. त्याला अजून अंतिम सामना खेळायचा आहे. आरसीबी विरुद्धच्या सामन्यात बटलरने शतक झळकावून विराट कोहलीच्या विक्रमांची बरोबरी साधली आहे. एका हंगामात सर्वाधिक धावा बनविण्याच्या यादी विराट अव्वल स्थानी आहे. त्याने २०१६ च्या हंगामात ९७३ धावा केल्या होत्या. त्यांनतर दुसरा नंबर डेव्हिड वॉर्नरचा (David Warner) लागतो. वॉर्नरने सुद्धा २०१६ च्या हंगामात ८४८ धावा बनविल्या होत्या. आता त्या खालोखाल जोस बटलर आला आहे. ८२४ धावा बनवून तो तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. बटलर अद्याप एक सामना खेळणार असल्याने त्याला दुसऱ्या व पहिल्या स्थानी सुद्धा जाण्याची नामी संधी आहे. या यादीमध्ये चौथ्या स्थानी केन विल्यमसनचा (Kane Williamson) क्रमांक लागतो. त्याने २०१८ च्या हंगामात ७३५ धावा केल्या होत्या. तर पाचव्या क्रमांकावर ख्रिस गेल (Chris Gayle) आहे. त्याने २०१२ च्या हंगामात ७३३ धावा केल्या होत्या.

Jos Buttler

बटलरची विराटशी बरोबरी पण, विक्रम मोडणार का? (Jos Buttler Vs Virat Kohli)

जोस बटलरने यंदाचा हंगामात ४ शतक झळकावून विराटच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. तसेच एका हंगामात सर्वाधिक धावा बनविणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. त्याने ८२४ धावा केल्या असून अद्याप त्याला एक सामना खेळायचा आहे. डेव्हिड वॉर्नरच्या एका हंगामात ८४८ धावा आहेत. कदाचित हा विक्रम जोस बटलर पुढील सामन्यात मोडेल आणि या यादीत दुसऱ्यास्थानी झेप घेईल. पण, विराटला पिछाडीवर टाकण्यासाठी त्याचा विक्रम मोडित काढण्यासाठी त्याला मोठे दिव्य करावे लागणार आहे. पण, आयपीएल सारख्या स्पर्धेत काहीही शक्य आहे आणि अशी दिव्य आपण या पुर्वी देखिल पाहिली आहेत. विराटचा विक्रम मोडण्यासाठी बटलरला १४९ धावांची आवश्यकता आहे. म्हणजे आणखी एका मोठ्या शतकाची गरज आहे. बटलरने असे मोठे शतक झळकावले तर तो एका हंगामात पाच शतके ठोकणार पहिला फलंदाज ठरेल आणि विराटचा विक्रम देखिल मोडू शकेल. या आधी आपीएलमध्ये मोठी शतके झाली आहे. ख्रिस गेलने १७५ धावांची खेळी केली आहे. तर ब्रॅडन मॅक्युलम (Bradan Mccullum) याने १५८ धावांची खेळी केली आहे. तर यंदाच्या हंगामात क्विंटन डिकॉक (Quinton De Kock) याने ७० चेंडूत १४० धावा केल्या होत्या. त्यामुळे अशी एक वादळी खेळी बटलर याला अंतिम सामन्यात करावी लागेल.

Back to top button