रोहित शर्मा पत्नीसोबत सुट्टीसाठी पोहोचला मालदीवला | पुढारी

रोहित शर्मा पत्नीसोबत सुट्टीसाठी पोहोचला मालदीवला

मुंबई : दोन महिने आयपीएल खेळल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आराम करण्यासाठी मालदीवला गेला आहे. त्याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून मालदीवमधील काही फोटो शेअर केले आहेत.

Rohit Sharma

टीम इंडियाचा आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मासध्या पत्नी रितिका सजदेहसोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.. रोहितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रितिकासोबतचा फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे. सोबतच“पुढील काही दिवसांसाठी मला या सर्वाची अत्यंत आवश्यकता होती,”असे कॅप्शन रोहितने फोटोला दिले आहे. त्याच्यासोबत त्याची मुलगी समायरादेखील आहे. रोहितने एक फोटो पोस्ट केला आहे.

Rohit Sharma

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौर्‍यातून रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांच्यासह आणखी काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेत ५ टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे मिळालेल्या विश्रांतीचा रोहितने पुरेपूर वापर करत कुटुंबासह मालदीव गाठले आहे. साधारण 15 किंवा 16 जून रोजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसोबत रोहित इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी तयारीला लागणार आहे.

Rohit Sharma

IPL मधील मुंबईची कामगिरी निराशजनक

आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची कागमिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. मुंबई संघ या आयपीएलमध्ये सर्वात आधी स्पर्धेतून बाहेर पडला आहे. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच मुंबईचा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिला. या हंगामात मुंबईने केवळ चार सामने जिंकले आणि 10 सामने गमावले आहेत. तसेच रोहित शर्मा याची देखील वैयक्तिक कामगिरी यंदाच्या आयपीएलमध्ये अतिशय निराशजनक राहिली आहे. रोहित शर्माने यंदाच्या आयपीएलमध्ये 14 सामन्यांत केवळ 268 धावा करू शकला आहे. त्याला यंदाच्या सीझनमध्ये एकही अर्धशतक झळकावता आलेला नाही.

Rohit Sharma

Back to top button