आयपीएलमधील वादविवाद (भाग-२) | पुढारी | पुढारी

आयपीएलमधील वादविवाद (भाग-२) | पुढारी

2011

– कराबद्दल कूरकूर

2011 ला भारतात झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आयसीसीला केंद्र सरकारने 45 कोटींची कर सलवत देऊ केली होती. यात वर्ल्ड कपमधून मिळालेल्या उत्पन्नाचा समावेश होता. त्यानंतर कर माफीच्या वादाला तोंड फुटले होते. यावेळी शिवसेनेने न्यायालयात धाव घेत आयपीएलकडून महाराष्ट्र सरकार आणि प्राप्तिकर विभागाने करमणूक कर वसूल करावा, अशी मागणी केली होती.

2012

– किंग खानला नडला गार्ड 

2012 ला कोलकाता नाईट रायडर्स संघाचा संघमालक आणि अभिनेता शाहरुख खानवर मुंबई क्रिकेट असोसिएशनने 5 वर्षांसाठी वानखेडे मैदानावर येण्यास बंदी घातली होती. हे प्रकरण खूप गाजले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाहरुखची मुले मैदानावर खेळण्यास उत्सुक होती आणि मैदानावरील सुरक्षा रक्षकाने त्यांना मैदानावर येण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे शाहरुख भडकला आणि त्याने सुरक्षा रक्षकाबरोबर वाद घातला. या बाबतचा व्हिडीओ बाहेर आला. यावेळी शाहरुख खान ज्याप्रकारे सुरक्षा रक्षक त्याच्या मुलीबरोबर वागला. त्यामुळे तो चिडला होता. 

स्पॉट फिक्सिंग

2012 च्या आयपीएल हंगामात भारतातील एका वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन करून आयपीएलमधील पाच खेळाडू स्पॉट फिक्सिंगमध्ये गुंतले असल्याचा दावा केला होता. या वृत्ताचा आधार घेत आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या पाच अनकॅप खेळाडूंना तत्काळ निलंबित केले. या पाच खेळाडूंमध्ये डेक्कन चार्जर्सच्या टी. पी. सुधिंद्र, पुणे वॉरियर्सचा मोहनिश मिश्रा, किंग्ज इलेव्हन पंजाबच्या अमित यादव आणि शलभ श्रीवास्तव आणि दिल्लीचा क्रिकेटपटू अभिनव बाली यांचा समावेश होता. या प्रकरणातील दोन खेळाडूंचे नंतर निलंबन करण्यात आले.    

विनयभंगाचे प्रकरण

2012 च्या आयपीएल हंगामात अजून एक वाद निर्माण झाला होता तो म्हणजे विनयभंगाचा. अमेरिकेची नागरिक असलेली झोहाल हमिदने रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा खेळाडू ल्युक पोमेर्सबचने तिचा विनयभंग केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाची बरीच चर्चा झाल्यानंतर तिने ल्युकविरुद्धची तक्रार मागे घेतली होती.

2013

– पुणे वॉरियर्सची माघार

2013 च्या आयपीएल हंगामातून पुणे वॉरियर्सने माघार घेत असल्याची घोषणा केली. पुणे वॉरियर्सला पूर्ण फ्रेंचायजी फी भरता आली नाही. त्यानंतर बीसीसीआयने बँक गॅरेंटीमधून ही फी वसूल केली. त्यानंतर फ्रेंचायजीचे मालकी हक्क असलेल्या सहारा ग्रुपने आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला.

Back to top button