बीसीसीआय अध्यक्षांनी शारजातील फोटोत कोणाला केले ब्लर?  | पुढारी

बीसीसीआय अध्यक्षांनी शारजातील फोटोत कोणाला केले ब्लर? 

शारजा : पुढारी ऑनलाईन 

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुलींनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शारजा स्टेडियमला भेट दिली. या भेटीबाबतचे फोटे त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले. पण, त्यातील एका ब्लर केलेल्या फोटोने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. 

गेल्या आठवड्यातच बीसीसीआय अध्यक्ष १९ तारखेपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संयुक्त अरब अमिरीतीत दाखल झाले होते. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याने यंदाचा २०२० चा आयपीएल हंगाम संयुक्त अरब अमिरीतीत खेळवण्यात येणार आहे. आज सौरभ गांगुली यांनी शारजा स्टेडियमला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत राजीव शुक्ला आणि शारजातील मान्यवर व्यक्ती होत्या. या बाबतचे फोटो गांगुली यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले. या फोटोतील एका फोटोमध्ये बॅकग्राऊंडला असलेले होर्डिंग गांगुली यांनी ब्लर केले. या होर्डिंगवर पाकिस्तानी क्रिकेटपटूचे छायाचित्र होते. त्यामुळे गांगुली यांनी हे होर्डिंग ब्लर केले. 

येत्या १९ तारखेपासून आयपीएलचा १३ वा हंगाम सुरु होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावात ही आयपीएल होत असल्याने अनेक खबरदारीचे उपाय योजिले आहेत. ही आयपीएल बाय सिक्युर बबल मध्ये होणार आहे. त्यामुळे खेळाडूंचा आणि सपोर्ट स्टाफचा बाहेरील जगाशी संपर्क येणार नाही, यंदाची आयपीएल पहिली आयपीएल असेल जी प्रेक्षकांविना खेळवण्यात येणार आहे. आयपीएलचा पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. 

Back to top button