IPL: सेहवाग म्हणतो; ‘इडली’चा ‘वडापाव’वर विजय | पुढारी

IPL: सेहवाग म्हणतो; ‘इडली’चा ‘वडापाव’वर विजय

मुंबई: पुढारी ऑनलाईन

आयपीएलच्या १३ व्या हंगामातील सलामीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सवर ५ गडी राखून विजय मिळवला. अंबाती रायुडू (७१) आणि फाफ डु प्लेसिस (नाबाद ५८) या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर चेन्नईने आयपीएलमध्ये विजयाची सलामी ठोकली. चेन्नईच्या विजयानंतर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. दरम्यान, माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने आपल्या खास शैलीत ट्विट करत चेन्नईच्या विजयाचे स्वागत केले. 

इडलीने पुन्हा एकदा वडापावला हरवल असे भन्नाट ट्विट करत सेहवागने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. सेहवागने  ”आयपीएलची दमदार सुरुवात झाली. रायडू आणि फाफ डु प्लेसिस यांची खेळी दमदार होती. पण सॅम करनने केलेली छोटी पण महत्वाच्या खेळीने सामन्याचे चित्र बदलले. इडलीने पुन्हा एकदा वडा पावचा पराभव केला.” ट्विटमध्ये म्हटले आहे. 

दोन्ही राज्याच्या लोकप्रिय असणाऱ्या पदार्थांची उदाहरणे देत सेहवागने चेन्नईच्या विजयाचे आपल्या खास शैलीत विश्लेषण केले आहे.

Back to top button