#MIvCSK १९ : २९ निवृत्त १९ : ३० पुनरागमन, धोनीची धूम | पुढारी

#MIvCSK १९ : २९ निवृत्त १९ : ३० पुनरागमन, धोनीची धूम

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

आयपीएल टी- २० च्या १३ व्या हंगामाची आजपासून (दि. १९) संयुक्त अरब अमिरातीमधून सुरुवात होत आहे. पहिला सामना आयपीएलमधील दोन तगड्या तसेच गेल्या हंगामातील विजेत्या उपविजेत्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. यंदाची आयपीएल ही प्रेक्षकांविना होणार आहे. त्यामुळे मैदानात प्रेक्षकांचा ओसंडून वाहणारा उत्साह मिसिंग असणार आहे. असे असले ती प्रेक्षकांचा, चाहत्यांचा उत्साह सोशल मीडियावर मात्र चांगलाच ओसंडून वाहत आहे. 

पहिलाच सामना हाय व्होल्टेज असल्याने हंगामाच्या सुरुवातीपासूनच आयपीएलची हवा तयार होण्यास सुरुवात झाली आहे. सामना सुरु होण्यापूर्वीच सोशल मीडियावर मुंबईचे चाहते आणि चेन्नईचे चाहते एकमेकांना भिडत आहेत. यंदाच्या आयपीएलची वेळ बदलण्यात आली आहे. सामना ८ ऐवजी ७.३० ला सुरु होणार आहे. याच सामन्याच्या टाईमिंगची आणि धोनीच्या निवृत्तीची वेळ, त्याची जवळपास दीड वर्षानंतर मैदानावर परतण्याची वेळ या सर्वांबाबतच्या योगायोगाची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. 

धोनीने १५ ऑगस्ट २०२० ला ट्विट करून १९.२९ मला आजपासून निवृत्त समजा असे सांगत विचित्र प्रकारे निवृत्तीची घोषणा केली होती. चाहत्यांनी त्याच्याच स्टाईलमध्ये त्याच्या दीड वर्षानंतरच्या मैदानावरच्या पुनरागमनाची घोषणा केली. एका चाहत्याने ‘नशिब किंवा योगायोग, १९ : २९ ला निवृत्ती  १९ : ३० ला पुनरागमन’ असे धोनीचे टीम इंडियाच्या जर्सीतला आणि सीएसकेच्या पिवळ्या जर्सीतील असे दोन फोटो शेअर ट्विट केले. सोशल मीडियावर हे ट्विट सध्या चांगलाच धुमाकूळ घालत आहे. 

दुसऱ्या बाजूला मुंबई इंडियन्सच्या चाहत्याने बेंजो पथकाचा एक जुना गाजलेला व्हिडिओ पुन्हा शेअर करत मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना आपल्या संघाला चिअर करायला तयार आहात ना? असे ट्विट केले. विशेष म्हणजे हा व्हिडिओ कोल्हापूरमधील जोतिबा देवस्थानच्या यात्रेवेळीचा आहे. या व्हिडिओत बेंजो पथकातील वादकांनी आयपीएलच्या थीमवर सर्वांना ठेका धरायला लावला. 

Back to top button