DCvsKXIP : सुपर स्टॉयनिसमुळे दिल्लीचा 'सुपर' विजय | पुढारी

DCvsKXIP : सुपर स्टॉयनिसमुळे दिल्लीचा 'सुपर' विजय

दुबई : पुढारी ऑनलाईन 

दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील सामना टाय झाल्याने सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये पंजाबने दिल्लीसमोर ठेवेले ३ धावांचे आव्हान २ चेंडूत पार करुन यंदाच्या हंगामातील पहिला सुपर ओव्हरमध्ये गेलेला सामना दिल्लीने जिंकला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करत दिल्लीने २० षटकात १५७ धावा केल्या होत्या. यात २१ चेंडूत ५३ धावांची खेळी करणारा मार्कस स्टॉयनिसचा मोलाचा वाटा होता. त्यानंतर हे आव्हान चेस करताना पंजाबची अवस्था ५ बाद ५५ अशी झाली होती पण, सलामीवीर मयांक अग्रवालने ८९ धावांची झुंजार खेळी करत सामना जिंकण्याची स्थिती आणला. पण, अखेरच्या षटकात पुन्हा स्टॉयनिसने आपला जलवा दाखवत दिल्लीला अखेरच्या दोन चेंडूत विजयसाठी फक्त १ धावांची गरज असताना सलग दोन चेंडूवर दोन विकेट घेत सामना टाय केला. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या सामन्यात पंजाबचे दोन्ही सालामीवीर फक्त दोनच धावांवर  बाद झाल्याने दिल्लीसमोर विजयसाठी फक्त ३ धावांचे आव्हान होते ते त्यांनी २ चेंडूत पार करुन आपला हंगामातील पहिला विजय साजरा केला. या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या मार्कस स्टॉयनिसने २१ चेंडूत ५३ धावांची तुफानी खेळी करत फलंदाजीत आणि अखेरच्या दोन चेंडूवर दोन विकेट घेत गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली. 

दिल्ली कॅपिटल्सने ठेवलेल्या १५८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना किंग्ज इलेव्हनची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. सलामीला आलेल्या कर्णधार लोकेश राहुलने दमदार सुरुवात करत ४ षटकात ३० धावांपर्यंत मजल मारून दिली. पण, त्यानंतर मोहित शर्माने लोकेश राहुलला २१ धावांवर बाद करत पंजाबला पहिला धक्का दिला. त्यानंतर पंजाबच्या फलंदाजीला जी गळती लागली ती काही केल्या थांबली नाही. 

पंजाबचा जुना कर्णधार आणि सध्या दिल्ली संघाच्या फिरकी गोलंदाजीची धुरा सांभळणाऱ्या आर, अश्विनने आपल्या जुन्या संघाला करुण नायर आणि निकोलस पूरन यांना बाद करत पाठोपाठ दोन धक्के दिले. त्यामुळे पंजाबची बिननाबाद ३० वरुन ६ षटकात ३ बाद ३४ अशी अवस्था झाली. त्यानंतर रबाडाने पंजाबची शान असणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला अवघ्या १ धावेवर बाद करत पंजाबच्या फलंदाजीवर अजून एक तगडा वार केला.

त्यानंतर पंजाबचे होणारे पतन दुसऱ्या बाजूने हतबलतेने पाहणारा सलामीवीर मयांक अग्रवालने ६ व्या क्रमांकावर आलेल्या सर्फराज खानला साथीला घेऊन डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण, सर्फराज फक्त १२ धावांचेच योगदान देऊन माघारी परतला. त्यामुळे पंजाबची अवस्था १० षटकात ५ बाद ५५ अशी झाली.  

निम्मा संघ ५५ धावात माघारी गेल्यानंतर मयांक अग्रवाल आणि के गौतम यांनी पंजाबला सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी ६ व्या विकेटसाठी ४६ धावांची भागिदारी रचली. त्यामुळे पंजाबने आपले शतक १५ व्या षटकात पार केले. मयांक आणि गौतम सामन्यात रंगत भरणार असे वाटत असतानाच कसिगो रबाडाने २० धावांवर खेळणाऱ्या गौतमला बाद करुन पंजाबच्या अडचणीत वाढ केली. 

दरम्यान, सलामीवीर मयांकने आपली एकाकी झुंज कायम ठेवली. त्याने दिल्लीचा स्टार गोलंदाज आर. अश्विनच्या अनुपस्थितीचा चांगलाच फायदा उचलला. दिल्लीला एक गोलंदाज कमी पडल्याने त्यांना स्लॉग ओव्हरमध्ये मोहित शर्माकडून गोलंदाजी करवून घ्यावी लागली. त्यातच मयांकने धावांची गती वाढवत सामना जवळ आणण्याचा प्रयत्न केला. त्यात दिल्लीच्या कर्णधारानेच ७५ धावांवर खेळणाऱ्या मयांकचा झेल साडून मोठी चूक केली. आता पंजाबला अखेरच्या षटकात विजयासाठी १३ धावांची गरज होती. मयांकने स्टॉयनिसच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारत सामन्याचा नूरच पलटवला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर दोन धावा करून सामना ५ चेंडूत ५ धावा असा बॉल टू रन आणला. मयांकने तिसऱ्या चेंडूवर चौकार मारत विजयाची फक्त १ धावेची औपचारिक्ता बाकी ठेवली. आता ही औपचारिकता कधीही पूर्ण होईल असे वाटत असतनाच मयांक अखेरच्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर ६० चेंडूत ८९ धावा करत झेलबाद झाला. त्यामुळे आता पंजाबला विजयासाठी एका चेंडूत एका धावेची गरज होती. स्ट्राईकवर असणाऱ्या ख्रिस जॉर्डनला स्टॉयनिसने बाद करत सामना टाय केला.  

सुपर ओव्हरमध्ये मात्र पंजाबने अजब रणनिती आखत सलामीला केएल राहुल आणि पूरनला पाठवले. ८९ धावा करणारा मयांकला पाठवले नाही. त्यामुळे पंजाबने २ धावात दोन विकेट गमावल्या. त्यामुळे दिल्लीला विजयासाठी २ धावांचे माफक आव्हान मिळाले. ते आव्हान दिल्लीने 

तत्पूर्वी, किंग्ज इलेव्हन पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय मोहम्मद शमीने सार्थ ठरवत पॉवर प्लेमध्ये दोन विकेट घेत दिल्लीला अडचणीत आणले. शिखर धवन शुन्यावर धाबाद झाल्यानंतर तिसरे षटक टाकणाऱ्या  शमीने पृथ्वी शॉ ला ( ५ )  आणि त्यानंतर त्याच षटकात शिमरॉन हेटमायरला ( ७ ) बाद करत दिल्लीला चांगलेच हादरवले. 

दिल्लीची ३ बाद १३ अशी अवस्था झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत डाव सावरण्यासाठी मैदानावर आले. या दोघांनी सावध फलंदाजी करत संघाची पडझड रोखली. पण फिरकी गोलंदाज आल्यानंतर ऋषभ पंतने धोका पत्करत मोठे फटके मारून धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कर्णधार अय्यरनेही संधी मिळताच आपले हात खोलले. या दोघांनी मिळून १० व्या षटकात दिल्लीचे अर्धशतक धावफलकावर लावले. 

१० व्या षटकानंतर अय्यर आणि पंतने परिस्थितीचा अंदाज घेत आक्रमक फटके मारण्यास सुरुवात केली. श्रेयस अय्यरने स्क्वेअर बाऊंडरी मोठी आहे हे हेरुन गोलंदाजाच्या डोक्यावरुन मोठे फटके मारण्याची चाल खेळली. ही चाल यशस्वी ठरली त्यामुळे दिल्लीने वेगाने आपली धावगती वाढवली. पण, अय्यरने जो शहाणपणा दाखवला तो ऋषभ पंतला दाखवता आला नाही. तो आडवा फटता मारण्याच्या नादात ३१ धावांवर रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर बोल्ड झाला. 

पंत बाद झाला त्यावेळी दिल्लीच्या १४ षटकात ८६ धावा झाल्या होत्या. आता दिल्लीची सर्व मदार कर्णधार अय्यरवर होती. पण, केएल राहुलने एकच षटक शिल्लक राहिलेल्या शमीला पुन्हा गोलंदाजी देण्याचा जुगार खेळला. शमीनेही दिल्लीचा हुकमी ऐका श्रेयस अय्यरला ३९ धावांवर बाद करत हा निर्णय योग्य ठरवला. दिल्लीचे दोन्ही सेट झालेले फलंदाज बाद झाल्याने त्यांच्यावर दबाव वाढला. 

दिल्लीकडे आता फक्त अखेरची ५ षटकेच राहिली होती. आता क्रिजवर मार्कस स्टॉयनिस आणि अक्षर पटेल आले होते. पण, अक्षर पटेल ६ धावा करुन स्वस्तात माघारी परतला. दरम्यान, स्टॉयनिसने आपले हात खोलत चौफेर फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. त्याने कॉर्टेलने टाकलेल्या १९ व्या षटकात तीन चौकार मारत दिल्लीला १२७ धावांपर्यंत पोहचवले. पण, याचवेळी अश्विन ४ धावांवर बाद होत स्टॉयनिसची साथ सोडली. अखेरच्या षटकाची स्टॉयनिसने २ षटकार आणि ३ चौकार मारत २५ धावा वसूल करुन दिल्लीला १५० च्या पार पोहचवले. त्याने केलेल्या २१ चेंडूत ५३ धावा करुन दिल्लीला १५७ अशी समाधानकारक धावसंख्या उभा करुन दिली. 

अधिक वाचा : 

प्रेक्षकांविना स्पर्धा सुनी सुनी वाटेल : श्रेयस

MIvsCSK: मुंबई इंडियन्सचा हा आठवा ‘पराक्रम’

 

Back to top button