कॅमेऱ्याची काच फोडणारा रसेलचा व्हिडिओ पाहिलात का? | पुढारी

कॅमेऱ्याची काच फोडणारा रसेलचा व्हिडिओ पाहिलात का?

आबुदाबी: पुढारी ऑनलाईन

आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरूवात झाली आहे. आत्तापर्यंत तीन सामने पार पडले असून कोलकाता नाईट रायडर्स संघाचा पहिला सामना २३ तारखेला मुंबई इंडियन्ससोबत रंगणार आहे. तत्पूर्वीच संघाचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने आपल्या बॅटिंग फॉर्मची चुणूक सावादरम्यानच दाखवून दिली. सरावादरम्यान, आंद्रे रसेलन नेटमध्ये तुफान फटकेबाजी करत ही फटकेबाजी कॅमेराबद्ध कणाऱ्या कॅमेऱ्याचीच काच फोडली.  सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत असताना रसेलने काही उत्तुंग फटके खेळले. याचवेळी नेट्समध्ये लावलेल्या कॅमेऱ्यालाही रसेलच्या फटकेबाजीचा बळी व्हावे लागले. रसेलचा एक फटका थेट कॅमेऱ्याच्या काचेवर जाऊन आदळला आणि त्या कॅमेऱ्याचा चक्काचूर झाला. कोलकाता नाईट रायडर्सने याचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.

आयपीएलमध्ये विजयाची पहिली सलामी चेन्नई सुपर किंग्ज संघाने ठोकली आहे. दिल्ली विरुद्ध पंजाब सामन्यात दिल्लीने तर बंगळुरु विरुद्ध हैदराबाद सामन्यात बंगळुरुने विजय मिळवत धडाकेबाज सुरुवात केली आहे. मुंबई इंडियन्सला सलामीच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध खेळत असताना मुंबईचा संघ आपला पहिला विजय  मिळवण्याच्या तयारीत असेल. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारतय हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

Back to top button