CSKvsRR : स्मिथने 'हा' निर्णय ५५१ डावांनंतर घेतला  | पुढारी

CSKvsRR : स्मिथने 'हा' निर्णय ५५१ डावांनंतर घेतला 

शारजा : पुढारी ऑनलाईन 

चेन्नई सुपर किंग्जने आज ( दि. २२ ) राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून राजस्थानला फलंदाजी करण्यास पाचारण केले. राजस्थानने प्रथम फलंदाजी करत चेन्नईसमोर २१७ धावांचे अवाढव्य आव्हान ठेवले. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या राजस्थानने हा धावांचा डोंगर रचताना आपल्या स्ट्रॅटेजीत थोडा बदल केला आणि हा बदल त्यांच्या चांगलाच पथ्यावर पडला. 

कर्णधार स्टीव्हनस्मिथने उथप्पा आणि संजू सॅमसनसारखे सलामीला खेळाणाऱ्या फलंदाजांऐवजी स्वतः सलामीला येण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे स्मिथने आपल्या १३ वर्षाच्या व्यावसायिक कारकिर्दीत एकदाही सलामीला फलंदाजी केली नव्हती. त्याने आतापर्यंतच्या ५५१ डावात सलामीची जागा सोडून इतर क्रमांकावर फलंदाजी केली होती. तो आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पहिल्यांदा सलामीला आला. 

त्याची ही पहिलीच सलामीवीराची इनिंग खास ठरली. त्याने ४७ चेंडूत ६९ धावांची दमदार खेळी केली. त्याने जवळपास १९ व्या षटकापर्यंत फलंदाजी केली. यात ४ षटकार आणि ४ चौकार मारले. त्याच्या या अँकर इनिंगमुळे राजस्थानला २०० चा टप्पा पार करता आला. 

Back to top button