KKRvsSRH : शुभमन गिलची दमदार बॅटिंग, केकेआरचा पहिला विजय | पुढारी

KKRvsSRH : शुभमन गिलची दमदार बॅटिंग, केकेआरचा पहिला विजय

अबु धाबी : पुढारी ऑनलाईन 

कोलकाता नाईट रायडर्सने सनराईजर्स हैदराबादचे १४३ धावांचे आव्हान १८ व्या षटकाताच पार करत आपला यंदाच्या हंगामातील पहिली विजय साजरा केला. केकेआरकडून सलामीवीर शुभमन गिलने सेन्सेंबल बॅटिंग करत ६० चेंडूत नाबाद ७० धावांची मॅच विनिंग खेळी केली. त्याला इऑन मॉर्गनने नाबाद ४२ धावा करुन उत्तम साथ दिली. या दोघांनी ३ बाद ५३ वरुन चौथ्या विकेटसाठी ९२ धावांची नाबाद भागिदारी रचत हैदराबादला सामन्यात पुनरागमनाची संधीच दिली नाही.

सनरायजर्स हैदराबादने ठेवलेल्या १४२ धावांचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सने दमदार सुरुवात केली. केकेआरचा धडाकेबाज फलंदाज सुनिल नारायण शुन्यावर बाद झाल्यानंतर दुसरा सलामीवीर शुभमन गिल आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या नितीश राणाने दमदार फलंदाजी केली. या दोघांनी केकेआरला पहिल्या ५ षटकात ४३ धावांवर पोहचवले. पण, १३ चेंडूत २३ धावा करणाऱ्या नितीश राणाला के नटराजनने बाद करत ही जोडी फोडली. दरम्यान, शुभमन गिलने विकेट पडल्या असतानाही पॉवर प्लेचा टेम्पो सहावे षटक संपेपर्यंत कायम राखत संघाला ५२ धावांपर्यंत पोहचवले.

दरम्यान, पॉवर प्लेनंतर कर्णधार दिनेश कार्तिक शुन्यावर बाद झाल्याने केकेआरच्या चिंता वाढल्या. पण, शुभमन गिल आणि इऑन मॉर्गन यांनी आणखी पडझड न होऊ देता चौथ्या विकेटसाठी भागिदारी रचण्यास सुरुवात केली. शुभमन गिलने आपले ४३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. दोघांनी मिळून केकेआरला १५ षटकात ११३ धावांपर्यंत पोहचवले. आता केकेआरला विजयासाठी ३० चेंडूत ३० धावांची गरज होती. आतापर्यंत सावध पवित्र्यात खेळणाऱ्या मॉर्गनने आपली धावगती वाढवत सामना लवकर संपवण्यास सुरुवात केली. दुसऱ्या बाजूने गिलनेही मिळालेला चेंडू सीमापार टोलावला. 

अखेरीस गिल आणि मॉर्गन यांनी चौथ्या विकेटसाठी ९२ धावांची भागिदारी रचत १४३ धावांचे आव्हान १८ षटकातच पार करुन केकेआरला यंदाच्या आयपीएलमधील आपला पहिला विजय मिळवून दिला. गिलने ६२ चेंडूत ७० धावांची खेळी केली तर मॉर्गनने २९ चेंडूच ४२ धावांची नाबाद खेळी केली. 

तत्पूर्वी, सनरायजर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण, कोलकाताच्या प्रभावी माऱ्यासमोर हैदराबादच्या फलंदाजांना आपले हात खोलता आले नाहीत. पॅट कमिन्सने जॉनी बेअरस्ट्रोचा ५ धावांवर त्रिफळा उडवत केकेआरला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर मात्र हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने मनिष पांडेच्या साथीने धावगती वाढवण्यास सुरुवात केली. पण, जवळपास साडेसहाच्या रनरेटने खेळणाऱ्या हैदराबादला चक्रवर्तीने मोठा धक्का दिला. त्याने ३६ धावांवर खेळणाऱ्या वॉर्नरलाचा पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

वॉर्नर बाद झाल्यानंतर क्रिजवर वृद्धीमान साहा आणि मिनष पांडे होते. पण, या दोघांनाही १२ व्या षटकापर्यंत धावगती वाढवण्यात यश मिळाले नाही. अखेर १३ व्या षटकानंतर या दोघांनी धावगती वाढवण्यास सुरुवात केली. अखेर हैदराबादने १६ व्या षटकात आपली शंभरी गाठली. अखेर शेवटची ४ षटके राहिली असताना पांडे आणि साहा यांनी धावगती झपाट्याने वाढवण्यास सुरुवात केली. दरम्यान, मनिष पांडेने ३५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण, अर्धशतकानांतर लगेचच मनिष पांडे रसेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ३८ चेंडूत ५१ धावा केल्या. त्यानंतर ३१ चेंडूत ३० धावांवर खेळणारा वृद्धीमान साहाही २० व्या षटकात माघारी परतला त्यामुळे हैदराबादचे १५०च्या जवळ जाण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. अखेर हैदराबादने ४ फलंदाजांच्या मोबदल्यात १४२ धावांपर्यंतच मजल मारली. 

केकेआर कडून पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती या दोघांनी टिच्चून मारा करत हैदराबादच्या मधल्या फळीला जखडून टाकले. दोघांनीही प्रत्येकी १ विकेट घेतल्या.

Back to top button