IPL: केएल राहुलने मोडला सचिनचा विक्रम! | पुढारी

IPL: केएल राहुलने मोडला सचिनचा विक्रम!

शारजाह : पुढारी ऑनलाईन

आयपीएल २०२० च्या सहाव्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलने एक खास विक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने आयपीएलमध्ये दोन हजार धावा पूर्ण केल्या आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याने ही कामगिरी केली.

केएल राहुलने सामन्याच्या पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकला आणि आयपीएलमध्ये त्याने २००० धावा पूर्ण केल्या. उमेश यादवने हे षटक टाकले. आयपीएलमध्ये २००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा केएल राहुल हा जगातील ३२ वा फलंदाज आहे. तर तो भारताचा २० वा फलंदाज आहे. सर्वात कमी डावांमध्ये त्याने ही कामगिरी झाली आहे.

आयपीएलच्या ६० व्या डावात राहूलने ही कामगिरी केली. त्याने मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. सचिनने ६३ डावांमध्ये २ हजार धावा केल्या होत्या. त्याने २० मे २०१२ रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध हा पराक्रम केला होता. आयपीएलमध्ये २ हजार धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू सुरेश रैना होता. ३० एप्रिल २०१२ रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध त्याने हा आकडा गाठला. 

किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुलने आयपीएल २०२० च्या मोसमातील पहिले शतक ठोकले. आरसीबीविरुद्ध शानदार फलंदाजी करत त्याने आयपीएल कारकिर्दीतील आपले दुसरे शतक झळकावले. गेल्या वर्षी राहुलने आयपीएलमध्ये पहिले शतक झळकावत नाबाद १०० धावा केल्या होत्या. आयपीएलमध्ये सर्वात मोठा डाव खेळणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. 

केएल राहुलने सेहवाग आणि वॉर्नरची बरोबरी केली

केएल राहुलने आरसीबीविरुद्ध ६२ चेंडूत शतक पूर्ण केले. शतकी खेळीत त्याने १२ चौकार आणि ३ षटकार लगावले. केएल राहुलने वीरेंद्र सेहवाग आणि डेव्हिड वॉर्नरची बरोबरी साधली आहे. तर कर्णधार आणि नॉन-कर्णधार म्हणून शतक ठोकण्याच्या बाबतीत तो तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी अशी कामगिरी वीरेंद्र सेहवाग आणि डेव्हिड वॉर्नरने केली आहे. केएल राहुलने ६९ चेंडूंत नाबाद १३२ धावा केल्या. ज्यात १४ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश आहे. या डावात त्याचा स्ट्राईक रेट १९१.३० राहिला.

Back to top button