अनुष्काच्या 'बॉलिंग' वक्तव्यावर गावस्करांचा खुलासा | पुढारी

अनुष्काच्या 'बॉलिंग' वक्तव्यावर गावस्करांचा खुलासा

दुबई : पुढारी ऑनलाईन 

भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनी अनुष्काच्या अनुषंगाने केलेल्या वक्तव्यावरुन उठलेल्या वादावर खुलासा केला आहे. सुनिल गावस्करांनी यंदाच्या आयपीएलमधील विराटच्या फलंदाजावरून वक्तव्य केले होते. त्यात त्यांनी अनुष्काचाही उल्लेख केला. यावर नाराज झालेल्या अनुष्काने इन्स्टाग्रामवर स्टेटस टाकत नाराजी व्यक्त केली होती. या सर्व प्रकरणावर गावस्करांनी आज (ता.२५) खुलासा केला. 

अधिक वाचा : पंजाबच्या तडाख्यानंतर विराटला आणखी एक दणका!

त्यांनी मी विराटच्या फलंदाजीच्या अपयशाला त्याच्या पत्नीला दोष दिलेला नाही. किंवी कोणतीही आक्षेपार्ह वक्तव्य केलेले नाही. सामन्यादरम्यान केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे, असा खुलासा केला. हा खुलासा त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. त्यांनी ‘मी पुन्हा ही गोष्ट सांगेन मी तीला कोठे दोष दिला आहे? मी फक्त एवढेच म्हणालो की त्या व्हिडिओत अनुष्का विराटला गोलंदाजी करत आहे. विराटने लॉकडाऊनमध्ये फक्त तिचीच गोलंदाजी खेळला आहे. तेही टेनिस बॉलवर, लॉकडाऊनमध्ये लोक टाईमपास करण्यासाठी असे खेळतात. इतकेच तर मी बोललो होतो. यात मी कोठे तिला विराटच्या अपयशाला जबाबदार धरले आहे?’ असे वक्तव्य करत आपला हेतू कोणत्याही बाबतीत अनुष्काला दोषी ठरवण्याचा आणि सेक्सिस्ट कमेंट करण्याचा नसल्याचे सांगितले. 

अधिक वाचा : गावस्करांच्या ‘बॉलिंग’ विधानावर अनुष्का भडकली!

ते पुढे म्हणाले की ‘मला एवढेच सांगायचे होते की लॉकडाऊनमध्ये कोणालाच सराव करता आलेला नाही. यात विराटचाही समावेश आहे. मी कोणावरही सेक्सिस्ट कमेंट केली नाही. माझे मन साफ आहे. जर कोणी त्याचा अर्थ वेगळा काढला असेल तर मी त्याला काय करु शकतो?’ 

अधिक वाचा : ‘विराटने लॉकडाऊनमध्ये फक्त अनुष्काच्या बॉलिंगचा सराव केला!’

Back to top button