KXIPvsRR LIVE : सलग दोन सामन्यात पंजाबच्या दोन सलामीवीरांचा शतकी तडाखा | पुढारी

KXIPvsRR LIVE : सलग दोन सामन्यात पंजाबच्या दोन सलामीवीरांचा शतकी तडाखा

शारजाह : पुढारी ऑनलाईन 

किंग्ज इलेव्हन पंजाबच्या दोन्ही सलामीवीरांनी गेल्या दोन सामन्यात तुफानी खेळी केल्या आहे. आरसीबीविरुद्धच्या गेल्या सामन्यात केएल राहुलने १३२ धावांचा शतकी तडाखा दिला होता. आज राजस्थान विरुद्धच्या सामन्यात दुसरा सलामीवीर मयांक अग्रवालने शतकी तकाखा देत पंजाबची टॉप ऑर्डर किती तगडी आहे याची प्रचितीच दिली.

किंग्ज इलेव्हन पंजाबने त्यांना प्रथम फलंदाजीला पाचारण करणाऱ्या राजस्थान रॉयल्सची पॉवर प्लेमध्ये चांगलीच धुलाई केली. या धुलाईत गेल्या सामन्यात शतकी तडाखा देणारा कर्णधार केएल राहुल नाही तर मयांक अग्रवाल आघाडीवर होता. या दोघांनी ५ व्या षटकातच संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. यात मयांकच्या १३ चेंडूत २७ धावांचे मोठे योगदान होते. दरम्यान, केएल राहुलनेही आपला आक्रमक अंदाज दाखवत पंजाबला ६ षटकात ६० धावांपर्यंत पोहचवले.

पॉवर प्लेनंतरही राहुल आणि अग्रवाल यांनी फटकेबाजी करणे सुरुच ठेवले. या दोघांच्या फटकेबाजीच्या स्पर्धेत अग्रवालने पहिल्यांदा बाजी मारत आपले अर्धशतक २६ चेंडूत पूर्ण केले. दरम्यान, पंजाबचे शतकही ९ व्या षटकात धावफलकावर लागले. ही यंदाच्या आयपीएलमधील पहिली शतकी सलामी ठरली. आतापर्यंत अग्रवालची फटकेबाजी दुसऱ्या बाजूने नुसताच बघत असलेल्या राहुनेही आपला गिअर बदलत आपले अर्धशतक ३५ चेंडूत पूर्ण केले. पण, तोपर्यंत संपूर्ण मैदानभर षटकारांची आतषबाजी करणारा मयांक अग्रवाल आपल्या शतकाच्या जवळ पोहचला होता. त्याने आपले शतक ४५ चेंडूत ठोकले. या शतकात त्याच्या ७ षटकार आणि ९ चौकारांचे मोठे योगदान राहिले.

लाईव्ह अपडेट : 

पंजाबच्या १४ षटकात बिनबाद १६१ धावा 

राहुलचे अर्धशतक, पंजाबच्या १२ षटकात बिनबाद १३८ धावा 

पंजाबच्या १० षटकात बिनबाद ११० धावा

मयांकचे धुवांधार अर्धशतक, पंजाबच्या ९ षटकात बिनबाद १०२ धावा 

पंजाबच्या ७ षटकात बिनबाद ६७ धावा 

मयांकची तुफान फटकेबाजी, पंजाबचे पाचव्या षटकातच अर्धशतक

पंजाबच्या २ षटकात बिनबाद ११ धावा 

नाणेफेक जिंकून राजस्थानचा गोलंदाजीचा निर्णय

Image

Image

Back to top button