मयांक आणि केएल राहुलचा आयपीएलच्या इतिहासातील आगळावेगळा पराक्रम! | पुढारी

मयांक आणि केएल राहुलचा आयपीएलच्या इतिहासातील आगळावेगळा पराक्रम!

शारजाह : पुढारी ऑनलाईन 

आयपीएलमध्ये आज सुपर संडे ठरला. केएल राहुलच्या पंजाबने आज राजस्थान रॉयल्सची चौफेर धुलाई करत मैदानावर अक्षरश: आतषबाजी केली.  पंजाबची सलामीची जोडी असलेल्या राहुल आणि मयंक तुफानी प्रहार करत राजस्थानला सळो की पळो की करून सोडले. यामध्येही कर्णधार राहुलपेक्षा मयांकचा तडाखा राजस्थानचा चांगलाच जिव्हारी लागला. मयांकने फक्त ५० चेंडूत ७ षटकार आणि १० चौकारांची आतषबाजी करत १०६ धावा कुटल्या. 

मयांकने दिलेल्या तडाक्याने आणि राहुलने ५४ चेंडूत केलेल्या ६९ धावांच्या खेळीमुळे राजस्थानला द्विशतकी मजल मारता आली. दोघांनी ९९ चेंडूत तब्बल १८३ धावांची सलामी देत भरभक्कम पायार रचला. या खेळीमुळे अनोख्या विक्रमाला गवसणी घातली गेली. ही आजवरच्या आयपीएलच्या इतिहासातील कोणत्याही भारतीय सलामीवीरांनी केलेली सर्वोत्तम कामगिरी आहे.

हा कारनामा यापूर्वी २०१७ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा यांनी केला होता. त्यांनी पहिल्या विकेटसाठी १५८ धावांची भागीदारी रचली होती. आता हा पराक्रम मयांक आणि राहुलच्या जोडीवर नोंदला गेला आहे.  

Back to top button