IPL 2020 : तेवतियाचे एका ओवरमध्ये ५ षटकार, सेहवाग म्हणाला...  | पुढारी

IPL 2020 : तेवतियाचे एका ओवरमध्ये ५ षटकार, सेहवाग म्हणाला... 

शारजा : पुढारी ऑनलाईन

आयपीएल २०२० मध्ये राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर ४ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यानंतर सगळीकडे चर्चा सुरु आहे ती राजस्थान रॉयल्सचा फलदांज राहुल तेवतियाची. राहुल तेवतियाने शेल्डन कॉट्रेलच्या एका ओवरमध्ये ५ षटकार ठोकले आणि त्याने राजस्थानला रॉयल्सला विजय मिळवून दिला. तेवतियाने ३१ चेंडूत ५३ धावांची खेळी. त्याच्या या खेळाचे सर्वत्र कौतुक होत आहे. टीम इंडियाचे माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने ‘तेवतिया में माता आ गई’ असे म्हणत एका वेगळ्या अंदाजात त्याचे कौतुक केले आहे.

सेहवागने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, ‘हिरो जन्मास येत नाहीत तर ते बनतात. तेवतिया में माता आ गई. असे क्रिकेट आहे आणि असेच जीवन आहे, काही मिनिटांतच ते बदलते. फक्त स्वतःला हारू देऊ नका. जर आपल्या कामगिरीवर विश्वास ठेवला तर बोट दाखवणारे देखील टाळ्या वाजवण्यास सुरु करतात.’

चौथ्या नंबरवर बॅटिंग करण्यास आलेल्या राहुल तेवतियाला सुरुवातीला एक-एक धावा घेण्यासाठी धडपड करावी लागली. तेवतियाने पहिल्या ८ धावा १९ चेंडूत केल्या. संजू सॅमसन आउट झाल्यानंतर राजस्थानने सामना जिंकण्याची आशा सोडून दिली होती. मात्र, तेवतियाने एक ओवरमध्ये चित्र बदलून टाकले. त्याने शेल्डन कॉट्रेलच्या एका ओवरमध्ये ५ षटकार लगावले आणि राजस्थानला विजय मिळवून दिला. 

 

Back to top button