केकेआरचा हँडसम फलंदाज आणि एमआय मेंटॉरच्या पोरीमध्ये 'कुछ कुछ होता हैं'? | पुढारी

केकेआरचा हँडसम फलंदाज आणि एमआय मेंटॉरच्या पोरीमध्ये 'कुछ कुछ होता हैं'?

मुंबई : पुढारी ऑनलाईन

कोरोनामुळे यंदाचे IPL सामने प्रेक्षकांविना दुबईमध्ये  सुरू आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये नव्या दमाच्या भारतीय खेळाडूंनी चांगली चमक दाखवली आहे. त्यांची चर्चा सध्या देशभरात सुरु आहे. यात केकेआरकडून खेळणाऱ्या शुभमन गिलचाही समावेश आहे. पण, शुभमन गिल फक्त त्याच्या बॅटिंगमुळेच नाही तर सोशल मीडियावरील पोस्ट आणि कमेंटमुळेही चांगलाच चर्चेत आला आहे. तो आणि सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर सध्या ट्रेंडिंगवर आहेत. या दोघांमध्ये मन की बात सुरु असल्याची वावडी सोशल मीडियावर उठली आहे. अजून पर्यंत या दोघांपैकी कोणीही याला दुजोरा किंवा याचे खंडन केलेले नाही. दोघांनीही ‘मौनम सर्वार्थ साधनम’ रणनिती अवलंबली आहे.  

यंदाच्या IPL मध्ये केकेआरकडून सलामीला येणारा भारताचा युवा फलंदाज शुममन गिल आणि साराच्या जीवनावर क्रिकेट चाहत्यांची चांगलीच नजर पडली आहे. दरम्यान या  दोघांनी एकसारखीच पोस्ट केल्याने त्यांच्यात ‘कुछ कुछ होता है’ सुरु झाले आहे की काय अशी शंका नेटकरी बोलून दाखवत आहेत.  

जुलै महिन्यात शुभमन आणि साराने सोशल मिडीयावरून एक फोटो शेअर केली होता.शेअर केलेल्या फोटोमध्ये ठळक साम्य होते ते फोटो कॅप्शनचे सारा आणि शुभमन यांनी आपल्या फोटो खाली दोन डोळ्यांच्या इमोजीसह i spy असे लिहले होते. विशेष म्हणजे दोघांनी एकाच दिवशी फोटो शेअर केले होते. या दोघांच्यात काही सुरू आहे की नाही हे माहित नाही. 

दरम्यान साराने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. मुंबई आणि कोलकाता याच्यांसामन्यातील साराने सामन्यातील छोटासा व्हिडिओ शेअर होता. यामध्ये केकेआरचा शुभमन गिल मुंबईच्या सूर्यकुमार यादवने मारलेला चेंडू थांबवण्याचा प्रयत्न करतोय. विशेष म्हणजे स्क्रिन शॉट पाहता या पोस्टवर हार्टशेप आहेत. आणि गल्लीतल्या एका छोट्या पोराला जरी मुलीने हार्टवाला व्हिडिओ शेअर केला आहे असे सांगितले तरी त्याच्या डोळ्यातून दिसणारे भाव तुम्हाला बरेच काही सांगून जातात. असेच भाव साराच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी दाखवल्यानंतर साराने तो व्हिडीओ हटवला परंतु, सोशल मीडियाच्या पंटर लोकांनी त्याचा स्क्रिनशॉर्ट काढून ठेवला आहे. हे स्क्रिनशॉट व्हायरल होत असून याचीच जोरदार चर्चा सुरू आहे. 

विशेष म्हणजे याच आयपीएल हंगामादरम्यान, दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ आणि मॉडेल प्राची सिंह यांच्यातही ‘जुळन येती रेशीम गाठी’ असं काही तरी सुरु असल्याच्या बातम्या आल्या आहेत. या दोन बातम्यांवरून नुकतेच मिसुरडे फुटलेल्या या पोरांनी फार कमी वयातच मैदान आणि मैदानाबाहेरचे ग्लॅमरस जग गाजवायला सुरुवात केलेली दिसते.

 

Back to top button