इशान किशनची गर्लफ्रेंड म्हणते ''मला तुझा अभिमान आहे बेबी'' | पुढारी

इशान किशनची गर्लफ्रेंड म्हणते ''मला तुझा अभिमान आहे बेबी''

मुंबई : पुढारी ऑनलाईन

रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध झालेला सामना मुंबईने गमावला असला तरी मुंबई इंडियन्सचा युवा फलंदाज इशान किशनने सर्वांची मने जिंकली. मुंबईचा संघ अडचणीत सापडला असताना इशानने आपल्या खेळीच्या जोरावर मुंबईला सुपरओव्हरपर्यंत पोहोचवले. मात्र, सुपरओव्हरमध्ये बंगलोरने सामना जिंकला. त्यामुळे इशान काहीसा निराश दिसला. मात्र, त्याला चिअर अप करण्यासाठी त्याची गर्लफ्रेंड आदिती हुंडाईने त्याच्यासाठी खास मेसेज लिहिला. सध्या तिचा हा मेसेज सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे. 

आदितीने इंस्टाग्रामवर इशान किशन आउट झाल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करतेवळी  कॅप्शनमध्ये, मला तुझा अभिमान आहे बेबी, असे लिहिले आहे.

२०२ धावसंख्येचा पाठलाग करताना संघ संकटात सापडलेला असतानाही इशानने संयमी खेळी करत एक बाजू लावून धरत संघाचे आव्हान कायम राखले. कायरन पोलार्डसोबत इशान किशनने ११९ धावांची भागीदारी केली.

अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत इशान किशन आणि कायरन पोलार्ड जोडीला मुंबईला विजय मिळवून देणार असे वाटत असतानाच किशन इसुरु उदानाच्या गोलंदाजीवर ९९ धावांवर बाद झाला. अवघ्या एका धावेने किशनने शतक हुकले. 

कोण आहे आदिती हुंडाई?

इशान आणि आदिती गेल्या २ वर्षांपासून एकत्र आहे. इशान किशानची गर्लफ्रेंड आदिती ही प्रसिद्ध मॉडल असून मिस इंडिया २०१७ ची फायनालिस्ट आहे. एवढेच नाही तर आदितीने २०१८ च्या मिस सुपरनॅचरल इंडियाचे विजेतेपदही पटकावले आहे. मागीलवर्षी आयपीएलच्या अंतिम सामन्यावेळी तिने सर्वांचे लक्ष वेधले होते. 

Back to top button