दीपक चहर १ जून रोजी होणार विवाहबद्ध | पुढारी

दीपक चहर १ जून रोजी होणार विवाहबद्ध

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : भारताचा व चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाज दीपक चहर याने मोठ्या रोमँटिक अंदाजात मागील आयपीएल स्पर्धेत गर्लफ्रेंड जया भारद्वाजला प्रपोज केले होते. दीपक व जया हे अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते आणि आता दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ जूनला या दोघांचे लग्न होणार आहे आणि त्यांची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. जया ही दिल्लीची राहणारी आहे आणि एका कार्पोरेट फर्ममध्ये काम करते.

दीपक चहर

आयपीएल २०२१ च्या प्ले ऑफ लढतीत दीपक जयाला प्रपोज करत होता, असे त्याचे वडील लोकेंद्र सिंग चहर यांनी सांगितले. पण, महेंद्रसिंग धोनीने त्याला अखेरच्या साखळी सामन्यात प्रपोज कर, असा सल्ला दिला. त्यामुळे पंजाब किंग्जविरुद्धच्या लढतीनंतर दीपकने स्टँडस्मध्ये जाऊन जयाला प्रपोज केले.

चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०२२ साठी दीपक चहरला १४ कोटींत पुन्हा आपल्या ताफ्यात घेतले. चेन्नईच्या यशात दीपकने महत्त्वाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे फ्रँचाईझीने त्याच्यासाठी एवढी रक्कम मोजली. पण, दीपकला दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएलमध्ये खेळताच आले नाही. तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनर्वसनासाठी गेला. तो पुढील दोन महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे.

दीपक चहर

त्यामुळे दीपक टी-२० वर्ल्डकपमधून कमबॅक करण्याची अपेक्षा आहे. त्याने भारताकडून २० टी-२० व ७ वन-डे सामन्यांत अनुक्रमे २६ व १० विकेटस् घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याने ६३ सामन्यांत ५९ विकेटस् टिपल्या आहेत.

Back to top button