गेलने केलेल्या भीम पराक्रमाने अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही; सेहवागने दिली नवी उपाधी! | पुढारी

गेलने केलेल्या भीम पराक्रमाने अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही; सेहवागने दिली नवी उपाधी!

दुबई : पुढारी ऑनलाईन

इंडियन प्रीमियर लीगमध्ये विंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलने आणखी एक भीम पराक्रम केला आहे. त्याची कोणी कल्पनाही केली नसेल. भविष्यात जेव्हा जेव्हा येणाऱ्या पिढीतील फलंदाज ख्रिस गेलच्या या पराक्रमाकडे पाहतील तेव्हा त्यांच्याह अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. 

.

अधिक वाचा : आरसीबीचे टार्गेट ‘प्ले ऑफ’

शुक्रवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध ख्रिस गेलने आपल्या टी -20 कारकिर्दीचा 410 वा सामना खेळला आणि या सामन्यात त्याच्यासाठी मोठी कामगिरी झाली. दुर्दैवाने गेलने आपले शतक केवळ 1 धावेने गमावले. परंतु गेलने जे साध्य केले आणि यामुळे जगभरातील दिग्गज आश्चर्यचकित झाले.

अधिक वाचा : मुंबईचे लक्ष्य स्थान भक्कम करण्याचे

गेलने राजस्थानविरुद्ध फक्त 63 चेंडूत 8 षटकार आणि 6 चौकारांसह 99 धावा केल्या. आणि सामन्यापूर्वी गेलने 409 टी-20 सामन्यात 993 षटकार ठोकले होते. या फॉर्मेटमध्ये एक हजार षटकार लगावण्यासाठी त्याला सात षटकारांची गरज होती आणि राजस्थानविरुद्ध 8 षटकारांसह गेलने इतिहास रचला. असा इतिहास जो मोठ मोठ्या दिग्गजांनाही मोडण्यासाठी कठीण जाईल.

अधिक वाचा : आरसीबीने पांड्याला डिवचले आणि बदला सूर्यकुमारने घेतला; ‘त्या’ ॲक्शनची जोरदार चर्चा! (video)

गेलच्या विक्रमानंतरह क्रीडा दिग्गजांनी सोशल मीडियावर त्यांचे मनापासून अभिवादन केले. स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या सेहवागने गेलला टी-20 चा सर डॉन ब्रॅडमन आणि करमणुकीचा जनक ही पदवी दिली!

अधिक वाचा : जेव्हा विराट अनुष्काला भर मैदानातूनच विचारतो जेवलीस का? (video)

 

Back to top button