आयपीएलमधील ‘प्लेऑफ’ च्या लढती ठरल्या | पुढारी

आयपीएलमधील ‘प्लेऑफ’ च्या लढती ठरल्या

दुबई : पुढारी ऑनलाईन

युएईमध्ये खेळल्या जात असलेल्या इंडियन प्रिमियर लीग अर्थात आयपीएलचा यंदा १३ वा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. ५६ सामने खेळल्यानंतर आता प्लेऑफचे सामने सुरु होणार आहेत. यातून या हंगामाचा विजेता निश्चित होणार आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहचलेले संघ अत्यंत सुरशीने एकमेकांशी भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत. मंगळवारी झालेल्या सामन्यात  हैदराबादने मुंबईला पराभूत केल्यावर हैदराबाद प्लेऑफमध्ये पोहचणारी चौथी टीम ठरली. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामधील एक या हंगामातील विजेता ठरेल.

वाचा : महिला टी-२० चॅलेंज आजपासून  

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये होणार पहिला क्वालिफायर

गुणतालिकेत मुंबई प्रथम तर दिल्ली दुसऱ्या स्थानवर आहे. यंदाच्या आयपीएमध्ये पहिला क्वालिफायर सामना या दोघांमध्ये गुरुवारी (दि.५) खेळला जाणार आहे. दुबई येथील मैदानात हा सामना रंगेल. गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असल्याने या दोन्ही संघाना याचा फायदा होणार आहे. या क्वालिफायर सामन्यात कोणीही हरले तरी त्यांना पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळणार आहे. पहिल्या क्वालिफायर सामन्यात जिंकणारा संघ थेट अंतिम सामान्यासाठी पात्र ठरेल. तसेच यामध्ये पराभूत होणारा संघ दुसऱ्या क्वालिफार सामन्यामध्ये एलिमिनेटर सामन्यातील विजेत्या सोबत भिडेल.  

एलिमिनेटरमध्ये बेंगलोर आणि हैदराबाद आमने सामने

एलिमिनेटर सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबाद हे रॉयल चॅलेंजर्स सामना करतील. हे दोन्ही संघ शुक्रवारी (दि.६) एकमेकांशी भिडतील. हा सामना आबुधाबी येथील शेख जायद मैदानावर खेळला जाईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ आयपीलमधून बाहेर पडेल तर विजेता संघ क्वालिफायर २ च्या सामन्यासाठी पात्र ठरतील. जेथे त्यांची गाठ क्वालिफार १ मधील पराभूत संघाशी पडणार आहे.

वाचा : SRHvsMI : हैदराबादने केकेआरला दाखवला बाहेरचा रस्ता

दुसरा क्वालिफायर सामना

एलिमिनेटर सामना जिंकणारा संघ आणि क्वालिफायर १ मध्ये पराभूत होणार संघ दुसऱ्या क्वालिफायर सामन्यासाठी एकमेकांसमोर उभे ठाकतील. क्वालिफायर २ चा सामना अबुधाबी येथील मैदानावर रविवारी (दि. ८) खेळला जाणार आहे. यामध्ये पराभूत होणार संघ आयपीएलमधून बाहेर पडेल. तर विजेता संघ क्वालिफार १ मधील विजेत्याशी अंतिम सामन्यात भिडेल. आयपीएलचा अंतिम सामना १० नोव्हेंबर रोजी दुबई येथे खेळला जाणार आहे.  

Back to top button