कॅप्टन असावा तर असा! फायनलमध्ये एन्ट्री केल्यानंतर रोहितने राहुल चहलला दिला 'स्पेशल' मान! | पुढारी

कॅप्टन असावा तर असा! फायनलमध्ये एन्ट्री केल्यानंतर रोहितने राहुल चहलला दिला 'स्पेशल' मान!

दुबई : पुढारी ऑनलाईन

भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने पहिल्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला 57 धावांनी पराभूत इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. पण संघाचा कर्णधार रोहित शर्माने सामन्यात विशेष कामगिरी दर्शवली नसली तरी एका गोष्टीने सर्वांचे मन जिंकले आहे. 

वाचा: सनरायजर्स आज आरसीबीशी भिडणार

झालेल्या सामन्यात फिरकीपटू राहुल चहर अपयशी ठरला. पण रोहित शर्माने त्याच्यावर नाराजी व्यक्त न करता त्याचे मनोबल वाढवण्यासाठी रोहित शर्माने मोठे मन दाखवले. सामना संपल्यानंतर ड्रेसिंग रुमपर्यंत संघाचे नेतृत्व करण्याची धुरा राहुलकडे सोपवली. रोहितचे मनाचा मोठेपणाने सर्वांचीच मने जिंकली आहेत. 

वाचा: IPL 2020 : मुंबई इंडियन्स ‘अंतिम’ फेरीत

सर्वांची कामगिरी चोख झालेली असताना राहुल चहरला मात्र महागडा ठरला. त्याच्या दोन षटकात डीसीच्या फलंदाजांनी ३५ धावा चोपल्या. संघाच्या विजयात राहुल अपयशी ठरला असला तरी रोहितने युवा खेळाडूला दिलेला मान पाहुन कॅप्टन असावा तरअसा अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटू लागली. त्याच्या या कृत्यामुळे रोहितवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

Back to top button