आयपीएल सोडा महिला बीबीएलमधील 'हा' भन्नाट कॅच पाहिलात का? ( Video ) | पुढारी

आयपीएल सोडा महिला बीबीएलमधील 'हा' भन्नाट कॅच पाहिलात का? ( Video )

पुढारी ऑनलाईन डेस्क 

संयुक्त अरब अमिरातीमध्ये होत असलेल्या आयपीएलमध्ये आतापर्यंत आपण अनेक अप्रतिम कॅच पाहिले आहेत. पण, ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या महिला बिग बॅश लीगमध्येही आयपीएलच्या तोडीस तोड क्षेत्ररक्षण दिसत आहे. ब्रिसबेन हीट आणि अॅडलेड स्ट्रायकर यांच्यात आज ( दि. ७ )  झालेल्या सामन्यात असाच एक भन्नाट कॅच पहायला मिळाला. 

अॅडलेड स्ट्रायकरची फिरकी गोलंदाज अमांडा विलिंग्टनने ब्रिसबेन हीट्या अमेलिया केर्रला एक फुलटॉस बॉल टाकला. पण, अमेलियाला तो चांगला मिडल करता आला नाही. त्यामुळे तो शॉर्ट मिडविकेटला उभ्या असलेल्या मॅडी पेन्नाकडे उडाला. पण, बॉल मॅडीच्या हाता लागून पुन्हा हवेत उडाला. हा हवेत उडालेला बॉल शॉर्ट मिड – ऑनला उभ्या असलेल्या ताह्लिया मॅग्राथने फूल लेंथ डाईव्ह मारत पकडला. सध्या हा भन्नाट कॅट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.  

या कॅचचा अॅडलेड स्ट्रायकरला ब्रिसबेन हीटला १८ धावांनी मात देण्यात चांगलाच हातभार लागला. फिरकी गोलंदाज विलिंग्टननने ३ षटकात १९ धावा देत दोन बळी टिपले. त्यातील एक म्हणजे हा भन्नाट कॅच. 

Back to top button