दिवस-रात्र कसोटीसाठी निम्म्या प्रेक्षकांना परवानगी | पुढारी

दिवस-रात्र कसोटीसाठी निम्म्या प्रेक्षकांना परवानगी

सिडनी : वृत्तसंस्था

भारताविरुद्ध 17 डिसेंबरपासून अ‍ॅडलेड ओव्हलवर होणार्‍या पहिल्या दिवस-रात्र कसोटीत 27 हजार प्रेक्षक असणार असून, स्टेडियमच्या क्षमतेपेक्षा ही संख्या 50 टक्के आहे, अशी घोषणा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी केली. कोरोनामुळे क्रिकेट सामने जैव सुरक्षित वातावरणात  प्रेक्षकाशिवाय खेळले जात आहेत. मात्र, भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या मालिकेत प्रेक्षक असणार आहेत.

भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये 3 एकदिवसीय, 3 टी-20 आणि 4 कसोटी सामने खेळणार आहेत. दौर्‍याची सुरुवात 27 नोव्हेंबरला सिडनीमध्ये एकदिवसीय सामन्याने होईल. कसोटी मालिका 17 डिसेंबरपासून अ‍ॅडलेड येथे खेळविण्यात येईल. अ‍ॅडलेड ओव्हल येथे प्रेक्षक क्षमतेच्या 50 टक्के तिकिटांची विक्री केली जाणार आहे. प्रत्येक दिवशी 27 हजार तिकिटे उपलब्ध असतील. भारतीय कर्णधार विराट कोहली फक्‍त अ‍ॅडलेड कसोटी सामना खेळणार आहे. ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना 26 डिसेंबर ते 30 डिसेंबरदरम्यान मेलबर्न येथे खेळविण्यात येणार आहे. ज्याच्या एकूण क्षमतेच्या 25 टक्के तिकिटांची विक्री केली जाईल. 

Back to top button