IPL Final : मुंबई इंडियन्सचा आयपीएलवर 'पंजा' | पुढारी

IPL Final : मुंबई इंडियन्सचा आयपीएलवर 'पंजा'

दुबई : पुढारी ऑनलाईन 

मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर पाच विकेट्सनी विजय मिळवत आयपीएलवर पाचव्यांदा आपले नाव कोरले. मुंबईने दिल्लीचे १५७ धावांचे आव्हान १८.४ षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात पार केले. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने ५१ चेंडूत ६८ धावांची खेळी केली. त्याला इशान किशनने १९ चेंडूत आक्रमक ३३ धावांची खेळी करुन चांगली साथ दिली. दिल्लीकडून नॉर्थियाने २५ धावात २ तर रबाडा आणि स्टॉइनिसने प्रत्येकी १ विकेट घेतली. 

दिल्लीने ठेवलेल्या १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने दमदार सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉकने धडाकेबाज फलंदाजी करत या दोघांनी ४ षटकात ४५ धावांची सलामी दिली. पण, फलंदाजी करताना सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद होणाऱ्या स्टॉइनिसने आपल्या पहिल्याच चेंडूवर २० धावा करणाऱ्या डिकॉकला बाद केले. मात्र त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवने आल्या आल्या आक्रमक फटके मारत दिल्लीवर दबाव वाढवला. 

दुसरीकडे सेट झालेल्या रोहित शर्माने आपल्या पोतडीतून एक एक आक्रमक शॉट बाहेर काढत मुंबईला १० षटकात ९० धावांपर्यंत पोहचवले. सूर्यकुमार आणि रोहितच सामना जिंकून देतील अशा अविर्भावात ते खेळत होते. दरम्यान, कर्णधार रोहितने आपले अर्धशतक पूर्ण करुन घेतले. पण, त्यानंतर चुकीच्या कॉलमुळे सूर्यकुमार धावबाद झाला. त्याने रोहितसाठी आपली विकेट दिली. 

मात्र सूर्यकुमारच्या विकेटचा मुंबईच्या आक्रमकतेवर कोणताही परिणाम झाला नाही. कारण, सूर्यकुमारनंतर आलेल्या इशान किशनने सुंदर फटकेबाजी करत सामना लगेचच मुंबई इंडियन्सच्या कवेत घेतला. पण, मुंबईला २४ चेंडूत विजयासाठी २० धावांची गरज असताना नॉर्खियाने कर्णधार रोहितला ६८ धावांवर बाद करत मुंबईला तिसरा धक्का दिला. हा मुंबई इडियन्ससाठी नर्व्हस पॉईंट होता. त्यानंतर दिल्लीाचा हुकमी एक्का रबाडाना पोलार्डला ९ धावांवर बाद केले. मुंबईला आता विजयासाठी १७ चेंडूत १० धावांची गरज होती. क्रिजवर आलेल्या चौकार मारत मुंबईवरचे टेन्शन दूर केले. अखेर पांड्याने 

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला ट्रेंट बोल्टने सुरुवातीलाच दोन धक्के दिले. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर मार्कस स्टॉइनिसला बाद करत बोल्टने दिल्लीची अवस्ठा एका चेंडूत १ बाद शुन्य धावा अशी केली. त्यानंतर बोल्टनेच अजिंक्य रहाणेला अवघ्या २ धावांवर बाद करत दिल्लीला दुसरा धक्का दिला. या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिखर धवनने ३ चौकारांच्या मदतीने १५ धावा केल्या पण, जयंत यादवने त्यालाही बाद करत दिल्लीची अवस्था ३.३ षटकात ३ बाद २२ अशी केली. 

या पडझडीनंतर कर्णधार श्रेयस अय्यरने ऋषभ पंतच्या साथीने भागिदारी रचण्यास सुरुवात केली. या दोघांनी दिल्लीला ९ षटकात ५९ धावांपर्यंत पोहतचवले. दोघांनीही सेट झाल्यानंतर धावांची गती वाढवण्यास सुरुवात केली. या दोघांनी चौदाव्या षटकात संघाचे शतक धावफलकावर लावले. दरम्यान पाचव्या क्रमांकावर आलेल्या पंतने आक्रमक फलंदाजी करत पहिल्यादा अर्धशतक पूर्ण केले. पण, अर्धशतकानंतर पंत लगेचच बाद झाला. 

पंत बाद झाल्यानंतर कर्णधार अय्यरने डावाची सुत्रे आपल्या हातात घेत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण, त्याला दुसऱ्या बाजूने साथ देणारा हेटमायर अवघ्या ५ धावांचे योगदान देऊन बाद झाला. त्याला दमदार गोलंदाजी करणाऱ्या बोल्टने बाद केले. त्यामुळे दिल्लीची अवस्था १७.२ षटकात ५ बाद १३७ धावा अशी झाली होती. यामुळे दिल्लीची धावगती मंदावली. अखेरच्या षटकात अक्षर पटेलही ९ धावांची भर घालून परतला. अखेर अय्यरने अखेर षटकार मारून संघाला २० षटकात ७ बाद १५६ धावांपर्यंत मजल मारून दिली. अय्यरने ४७ चेंडूत नाबाद ५८ धावा केल्या. 

Back to top button