काँग्रेस नेते विराटला अनुष्काचा कुत्रा म्हणाले? | पुढारी

काँग्रेस नेते विराटला अनुष्काचा कुत्रा म्हणाले?

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

काँग्रेस नेते आणि माजी खासदार उदित राज यांनी भारताचा कर्णधार विराट कोहलीबद्दल अपमानजनक ट्विट केले आहे. उदित राज यांनी विराट कोहलीला अनुष्का शर्माचा कुत्रा असे संबोधले आहे. यावरून सोशल मीडियावर उदित राज यांच्यावर जोरदार टीका सुरु आहे. 

उदित राज यांनी ट्विट केले की ‘अनुष्काला आपला कुत्रा विराट कोहलीला सांभाळायची गरज नाही. कुत्र्यापेक्षा जास्त इमानदार कोणी नाही. कोहलीने तुम्हा लुच्चे, लफंगे आणि मूर्खांना संदेश दिलाय की प्रदुषणामुळे मानव जात धोक्यात आहे. तुम्हा लोकांचा डीएने तपाला पाहिजे की तुम्ही मुळचे इथलेच आहात की नाही?’

विराट कोहलीने धनत्रयोदशीला एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत देशवासियांना दिवळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. याचबरोबर त्याने प्रदुषण रोखण्यासाठी फटाके न फोडण्याचे ही आवाहन केले होते. पण विराट कोहलीच्या या ट्विटवर जोरदार प्रतिक्रिया देत अनेकांनी #अनुष्का अपणा कुत्ता संभाल हा हॅशटॅग ट्रेंटमध्ये आणला. 

Happy Diwali 🙏🏻 pic.twitter.com/USLnZnMwzT


— Virat Kohli (@imVkohli) November 14, 2020

दरम्यान, या ट्रेंटवर उदित राजने आपली प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेत तसे बघायला गेले तर त्यांनी विराट कोहलीचे समर्थनच केले आहे. पण, त्यांनी विराट कोहलीला अनुष्काचा कुत्रा म्हणाल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. दरम्यान, त्यांनी त्याला जोडूनच दुसरा ट्विट करत ‘विराट कोहलीच्या संदेशाचे स्वागतच करायला हवे. पण, कोही दुष्ट लोकांनी ट्विटरवर घाण शिव्या देण्यास सुरुवात केली आहे. या सर्वाला मुक संमती असल्यासारखे सरकार याच्याकडे फक्त बघत बसली आहे याचेच आश्चर्य वाटते. यांच्या विरुद्ध अजून कारवाई झालेली नाही. हे मनुष्य असूच शकत नाहीत. कत्र्यालाही वाईट म्हणत आहेत. कुत्र्यापेक्षा जास्त इमानदार कोणी नाही.” आपल्याला काय म्हणायचे आहे हे स्पष्ट केले. 

विराट कोहली के सुझाव का स्वागत लेकिन कुछ दुष्टों ने ट्वीटर पर भद्दी गालियाँ देना शुरू कर दी।हैरान हूँ कि सरकार ये सब देख रही जैसे कि मौन सहमति हो। इनके ख़िलाफ़ कार्यवाही अभी तक नही हुई।ये इंसान नही हो सकते।कुत्ते को भी बुरा कह रहे हैं ।कुत्ता से ज़्यादा वफ़ादार कोई नही।


— Dr. Udit Raj (@Dr_Uditraj) November 15, 2020

Back to top button