'दोस्ता एक दिवस स्वर्गात फुटबॉल खेळू' | पुढारी

'दोस्ता एक दिवस स्वर्गात फुटबॉल खेळू'

रिओ : पुढारी ऑनलाईन 

ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी दिएगो मॅराडोना यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले. मॅराडोना यांचे बुधवारी ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. पेले यांनी एका वृत्तसंस्थेला ‘एक दिवस नक्कीच आपण स्वर्गात फुटबॉल खेळू’ असे आपले वक्तव्य प्रसिद्ध करत मॅराडोना यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले. 

या वक्तव्यानंतर पेले यांनी ट्विट केले की ‘काय दुःखद बातमी. मी माझा महान मित्र गमावला आणि जगाने एक लेजंड. मला बरच काही सांगायचं आहे. पण, आता फक्त देव त्याच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची ताकद देवो. मला आशा आहे की एक दिवस आपण स्वर्गात एकत्र खेळू’

मॅराडोना आणि पेले हे फुटबॉल जगातील महान खेळाडू म्हणून गणले जातात. हे दोघेही एकमेकांचा चांगला आदर करतात आणि एकमेकांच्या खेळाचाही सन्मान करतात. जरी मॅराडोना हे पेलेंपेक्षा २० वर्षांनी लहान असले तरी त्यांच्यामध्ये अनेक दशके चांगली मैत्री राहिली आहे. 

 

Back to top button