हार्दिक पंड्यामुळे संघाचे संतुलन बिघडले : गंभीर | पुढारी

हार्दिक पंड्यामुळे संघाचे संतुलन बिघडले : गंभीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

भारताचा अष्टपैलू म्हणून गणला जाणारा हार्दिक पंड्या पाठदुखीमुळे गोलंदाजी करीत नाही, त्यामुळे संघात सहाव्या गोलंदाजांची उणीव भासत आहे, हे भारताच्या पराभवाचे प्रमुख कारण आहे, असे मत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने व्यक्त केले आहे. तो निव्वळ फलंदाज बनल्याने संघाचे संतुलन बिघडले आहे, विजय शंकर हा त्याला पर्याय ठरू शकत नाही, असेही गंभीर म्हणाला.

भारताला पहिल्या वन-डे सामन्यात 66 धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात हार्दिकने 90 धावांची खेळी केली; परंतु त्याने गोलंदाजी केली नाही. गंभीर म्हणतो की, हार्दिक गोलंदाजी करीत नसल्याने संघात सहाव्या गोलंदाजाची कमतरता भासते. त्यामुळे पाच गोलंदाज दबावात येतात. कर्णधारापुढील पर्याय मयादित होतात. एखाद्या गोलंदाजाला मार पडत असेल तरीही त्याचा कोटा पूर्ण करावा लागतो. विजय शंकर हा मध्यमगती गोलंदाज आणि तडाखेबंद फलंदाज म्हणून ओळखला जातो; परंतु हार्दिकचा पर्याय म्हणून त्याला संघात स्थान द्यावे इतका अनुभव त्याच्याकडे नाही.

 

Back to top button