भारत - ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान 'अदानी विरोधक' पोहचले थेट खेळपट्टापर्यंत  | पुढारी

भारत - ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान 'अदानी विरोधक' पोहचले थेट खेळपट्टापर्यंत 

सिडनी : पुढारी ऑनलाईन 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना आज ( दि. २७ ) होत आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यासाठी मैदानाच्या ५० टक्के क्षमतेने क्रिकेट चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यास परवानगी दिली आहे. याचाच फायदा घेत ऑस्ट्रेलियातील अदानींच्या कोळसा खाण  प्रोजेक्टला  विरोध करण्याऱ्या आंदोलकांनी घेतला. त्यांनी थेट मैदानाच्या क्रिजपर्यंत जात आपला अदानींच्या प्रोजेक्टला असलेला विरोध दर्शवला. 

सामन्याचे ६ वे षटक टाकण्यासाठी नवदीप सैनी तयार होत असतानाच या दोन आंदोलकांनी मैदानात पळत घुसखोरी केली. दोघांपैकी एका आंदोलकाने थेट क्रिज गाठत आपल्या हातात असलेला अदानींच्या प्रोजेक्टला विरोध करणारा फलक झळकावला. दरम्यान, मैदानाच्या सुरक्षा रक्षकांनी या दोघांना मैदानाबाहेर काढले. 

कोरोना वैश्विक महामारीमुळे क्रिकेट चाहते मैदानापासून लांब होते. पण, ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या मालिकेसाठी मैदानाच्या आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने चाहत्यांना सामन्यासाठी उपस्थिती लावण्यास परवानगी दिली आहे. 

Back to top button