तिसरी कसोटी सिडनीतच | पुढारी | पुढारी

तिसरी कसोटी सिडनीतच | पुढारी

सिडनी : भारताविरुद्ध होणार्‍या तिसर्‍या क्रिकेट कसोटी सामन्याचे आयोजन सिडनी येथेच करण्याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला आहे. त्यामुळे तिसरा कसोटी सामना मेलबर्न येथे होणार, या चर्चेला आता विराम बसला आहे. तिसरा कसोटी सामना 7 जानेवारीपासून होणार आहे. मेलबर्नमध्ये दुसरा कसोटी सामना आठ विकेटस्ने जिंकत भारताने मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. ख्रिसमसपूर्वी सिडनीच्या उत्तरी भागात कोरोना विषाणूची प्रकरणे वाढल्याने मेलबर्नला तिसर्‍या कसोटीसाठी स्टँडबाय ठेवण्यात आले होते. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांमध्येदेखील मला हे सांगताना आनंद होत आहे की, क्रिकेट ऑस्ट्रेलिया पुरुष आंतरराष्ट्रीय मालिकेचे आयोजन पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार करण्याच्या मार्गावर आहे, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अंतरिम सीईओ निक हॉकले म्हणाले. 

Back to top button