भारताने लस पाठविल्यानंतर ख्रिस गेलनं मानले पीएम मोदींचे आभार! म्हणाला... | पुढारी

भारताने लस पाठविल्यानंतर ख्रिस गेलनं मानले पीएम मोदींचे आभार! म्हणाला...

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलने कॅरेबियन देशांना कोरोनावरील लसचा पुरवठा केल्याबद्दल भारताचे आभार मानले आहेत. एक व्हिडिओ पोस्ट करत गेलने पंतप्रधान मोदी आणि भारतातील लोकांप्रती आभार व्यक्त केले आहेत.

वाचा : वीज कनेक्शन तोडल्यामुळेच घडली महाराष्ट्रातील ‘पहिली शेतकरी आत्महत्या’

”जमैकाला लस दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी, भारत सरकार आणि भारतातील लोकांचे मला आभार मानायचे आहे. आम्ही भारतीयांचे कौतुक करतो,” असे गेलने म्हटले आहे.

भारताने जमैकासह अनेक देशांना कोरोना लसीचा पुरवठा केला आहे. यात भुतान, मालदीव, मॉरिशस, बहरीन, नेपाळ, बांगला देश, कॅनडा आणि श्रीलंकेचा समावेश आहे. याआधी वेस्ट इंडिजचे महान क्रिकेटर विवियन रिचर्ड्सने देखील कॅरेबियन देशांना कोरोनावरील लस पाठवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले होते.

वाचा : अंबानी स्फोटक प्रकरणात आणखी एक ट्विस्ट, एनआयएच्या तपासातून मोठा खुलासा! 

कोरोनावरील लसीकरणाच्या बाबतीत भारताने ब्रिटनला मागे टाकले. लसीकरणाच्या बाबतीत भारताच्या पुढे केवळ अमेरिका आहे. कोरोना संकटकाळात भारत जगाला लस देत आहे. 

लसीकरणाच्या दृष्टीने सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशील्ड तसेच भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन या दोन लसींना डिजीसीआयने परवानगी दिलेली आहे. 

वाचा : अंबानी स्फोटक कार प्रकरणात आणखी दोन गाड्यांची एन्ट्री!

Back to top button