इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघाची घोषणा | पुढारी

इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघाची घोषणा

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

२३ मार्च पासून भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंची घोषणा केली आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात मुंबईचा फलंदाज सूर्यकुमार यादव याला संधी देण्यात आली आहे. सूर्यकुमारसह ऑलराउंडर कृणाल पांड्या आणि प्रसिद्ध कृष्णला संघात पहिल्यांदाच स्थान मिळाले आहे.

वाचा : वीज कनेक्शन तोडल्यामुळेच घडली महाराष्ट्रातील ‘पहिली शेतकरी आत्महत्या’

भारत आणि इंग्लंड दरम्यान एकदिवसीय मालिकेतील तीन सामने पुणे येथील एमसीए स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना २३ मार्च रोजी तर दुसरा २६ मार्च आणि तिसरा सामना २८ मार्च रोजी खेळवला जाणार आहे.

वाचा : अंबानी स्फोटक प्रकरणात आणखी एक ट्विस्ट, एनआयएच्या तपासातून मोठा खुलासा! 

इंग्लंड विरोधातील चौथ्या टी-२० सामन्यात सूर्यकुमारला खेळण्याची संधी मिळाली. त्यात त्याने अर्धशतकी (५७ धावा) खेळी केली. त्याचे बक्षीस म्हणून त्याला आता एकदिवसीय सामन्यांत संधी देण्यात आली आहे. तर कसोटी मालिकेत चांगली कामगिरी न केल्याबद्दल शुभमन गिलला संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे. 

असा आहे भारतीय संघ…

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), के एल राहुल (यष्टीरक्षक), यजुर्वेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर.

वाचा : भारताने लस पाठविल्यानंतर ख्रिस गेलनं मानले पीएम मोदींचे आभार! म्हणाला…

Back to top button