धोनीच्या कोरोनाबाधित आई-वडिलांच्या प्रकृतीविषयी फ्लेमिंग म्‍हणाले... | पुढारी

धोनीच्या कोरोनाबाधित आई-वडिलांच्या प्रकृतीविषयी फ्लेमिंग म्‍हणाले...

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत संघाचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी माहिती देत संघाचा आणि व्यवस्थापनाचा कर्णधार आणि त्याच्या कुटुंबियांना संपूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले. धोनीचे वडील पान सिंह आणि आई देवकी देवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना रांचीच्या पल्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. 

धोनीला ‘हा’ कारनामा करण्यासाठी तब्बल एवढ्या चेंडूंचा करावा लागला सामना

फ्लेमिंग यांनी कोलोकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यांतर व्हर्चुअल प्रेस कॉन्फरन्सद्वारे पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ‘संघ व्यवस्थापकाच्या दृष्टीकोणातून आम्ही धोनीच्या कुटुंबियांच्या परिस्थितीविषयी अवगत आहोत. धोनी आणि त्याच्या कुटुंबियांना आमचा पाठिंबा आहे. आम्ही एमएसशी याबद्दल बोलत आहोत आणि सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पण, आम्ही परिस्थितीवर अजून काही दिवस लक्ष ठेवणार आहोत. हा सर्वांसाठीच कठीण काळ आहे.’ असे वक्तव्य केले. 

‘कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात वाढत आहे. याचा परिणाम जसा देशावर होत आहे तसाच त्याचा परिणाम आयपीएलवरही होत आहे. अनेकांचे मित्र आणि कुटुंबीय प्रभावित होत आहेत. आशा आहे की बायो बबल प्रभावित होऊ नये. आम्ही मित्रांची आणि कुटुंबियांची काळजीविषयी चर्चा करत आहोत. अशा परिस्थिती धोनीला साथ देण्याची गरज आहे ती आमची जबाबदारी आहे. आम्हाला आशा आहे की त्याचे कुटुंबीय लवकरात लवकर यातून बरे होतील.’

दरम्यान, पल्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयाने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार धोनीच्या कुटुंबियांची ऑक्सिजनची पातळी ही स्‍थिर आहे. चेन्नई सुपर किंग्ज सध्या ६ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. आता चेन्नई रविवारी रॉयल चॅलेंजर बेंगलोर बरोबर भिडणार आहे.

Back to top button