IPL : ‘थोडं कटू वाटेल पण मॉरिसला मला कधीही मिळाली नाही इतकी मोठी रक्कम मिळाली’ | पुढारी

IPL : 'थोडं कटू वाटेल पण मॉरिसला मला कधीही मिळाली नाही इतकी मोठी रक्कम मिळाली'

मुंबई : पुढारी ऑनलाईन 

आयपीएल २०२१ मध्ये आरसीबीने कालच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर मोठा विजय मिळवला. त्यानंतर पुन्हा एकदा विक्रमी बोली लागलेल्या ख्रिस मॉरिसबद्दल चर्चा सुरु झाली. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पिटरसनने एका वाहिनीवरील कार्यक्रमादरम्यान ‘हे थोडं कटू वाटेल पण मॉरिसला मला कधीही मिळाली नाही इतकी मोठी रक्कम मिळाली आहे. पण खरं सांगू का मला नाही वाटत की तो एवढ्या मोठ्या बोलीसाठी पात्र आहे. मला वाटते याचाच त्याच्यावर दबाव आहे.’ असे वक्तव्य केले. 

देवदत्त – विराट जोडीचे ‘एक’ नंबरी विक्रम 

या टीव्ही शो दरम्यान पिटरसन पुढे म्हणाला की, ‘तो दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठीही पहिल्या क्रमांकाचा पर्याय नाही. त्यामुळे आपण त्याच्याकडून फारच अपेक्षा करत आहोत. त्याच्याबद्दल फारच चर्चा होत आहे. मला नाही वाटत की तो असा खेळाडू आहे जो प्रत्येक वेळी दमदार कामगिरी करेल.’ 

पिटरसनने ‘हे मी अत्यंत आदरपूर्वक सांगत आहे. तो जे काही करतो ते फार खास आहे असं नाही. जरी त्याने धावा केल्या तरी त्या दोन सामन्यासाठी असतील नंतर काही सामने त्याला धावा करता येणार नाहीत. ही अशी गोष्ट आहे की ती तुम्ही बघू इच्छित नाही. हा त्याचा गुणधर्म आहे.’ असे म्हणत मॉरिस बद्दलचे आपले स्पष्ट मत व्यक्त केले.

RCBvsRR : राजस्थानवर ‘देव’दत्त कोपला

मॉरिसने आतापर्यंतच्या ४ सामन्यात १५४ च्या सरासरीने ४८ धावा केल्या आहेत. त्याने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात १८ चेंडूत ३६ धावांची खेळी करुन राजस्थानला त्यांचा हंगामातील पहिला विजय मिळवून दिला होता.  गोलंदाजीच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्याने आतापर्यंत ४ सामन्यात ५ विकेट घेतल्या आहेत. त्याची सरासरी ९.९२ इतकी आहे. 

Back to top button